सर्वांचे डोळे व्याख्यात्याकडे लागले होते. तो हळूच उठला. कुणाचीच नजर त्याच्यावर नव्हती. जनसमुदायांतून तो बाहेर जाऊं लागला. ज्यांच्या ज्यांच्या जवळून तो जाई! ते ते त्याच्याकडे रागानें बघत, जणू काय तो एक चिमुकला राक्षसच होता, आणि पुनः आपली नजर व्याख्यात्याकडे वळवीत. ज्या सद्गृहस्थाजवळ तो बसला होता त्यांचे डोळे निमिषांत लाल झाले. त्या चिमुकल्याला खाऊं की गिळू, की त्याचे पाय तोडून टाकून त्याची चाल बंद करूं असें त्याला झालें. परंतु आतां त्यांना काहींच करतां येण्यासारखें नव्हतें. तो सभागृहांतून बाहेर पडला होता. मार्गावर येतांच तो धांवू लागला, गाईचें वांसरु धांवतेंना, अगदी तसेंच! टांग्यांतील बँडचा आवाज दूर गेला होता.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .