जीवनाचा मोठा महत्त्वाचा पैलू द्रव्यार्जन हा आहे; लौकिक, प्रतिष्ठा, पत, लोकप्रियता, नातेवाइकांचें प्रेम या सर्वांचा बहुत अंशीं पाया द्रव्य हा आहे. इतरांच्या तोंडाकडे लाचारीने पाहवयास लागू नये इतकें लघुतम द्रव्य संसारी माणसाकडे पाहिजे. विद्यार्थीदशेंत मी एकहि पै मिळवू शकलों नाहीं. मला कोठल्याच प्रकारचें बक्षीस किंवा स्कॉलरशिप मिळाली नाही. बी. ए. झाल्यावर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पालीचा वर्ग घेऊं लागलों, शिकवण्या पत्करल्या आणि पालीचा खाजगी वर्ग काढला. सप्रे नांवाच्या विद्यार्थ्याने दिलेले शिकवणीचे चांदीचे चार रुपये ही माझी पहिली अर्जित रक्कम. दुर्दैव असे की त्याच दिवशीं आमच्या साताऱ्याच्या वाड्यांतल्या कांही भागाला आग लागली
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Purnanand Rajadhyakshya
4 महिन्यांपूर्वीलिखाणातील खुसखुशीत पणा जन्मापासूनकच अंगात असावा .. खूप छान लेख