हें काम करीत असतां अनेक शेतकरी ग्राहकांशीं माझा संबंध येऊ लागला. त्यांत दोन गोष्टी माझ्या मनावर वारंवार आघात करीत. त्यांतली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या समाजांत बोकाळलेला अंधविश्वास, दैववाद व न्यूनगंड. त्याचा मला पदोपदीं प्रत्यय येथून मन अस्वस्थ होई. आपण जगांत अितके मागे पडलों आहों, याचें कारण आपण स्वतंत्र व सद्यःकालाला अनुरूप असे विचार करण्यास असमर्थ झालों आहों असें मला दिसून येऊ लागलें. अर्थात् 'जुनें तें सोनें मानण्याच्या घातुक सवयीपासून समाज जितका लवकर मुक्त होअील व बुद्धिवादाचा अधिक उपयोग करूं लागेल तितक्या शीघ्रतेने आपली सध्याच्या दुर्दशेतून मुक्तता होईल हें माझें ठाम मत झालें.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .