परंतु अनंतरावांकडून मला असें समजलें की, मुंबई प्रांतांत कमीत कमी तीन वर्षे वकीली केल्याशिवाय न्यायाधिशाच्या नोकरीसाठी अर्ज करायची लायकी प्राप्त होत नाही. ते म्हणाले, पाहिजे तर मुंबईत माझ्याबरोबर काम कर किंवा एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहून वकीली कर-" वकीली करण्याच्या दृष्टीने मी आयुष्याचा कधीच विचार केला नसल्यामुळे कोठेहि वकीली करणें हा विचारच मला चमत्कारिक वाटला. अनंतरावांचा पाठिंबा असला तरी मुंबअतल्या अनेक बेकार वकीलांच्या हकीकती त्यांच्याच तोंडून वारंवार ऐकल्यामुळे, मुंबईसारख्या महाग ठिकाणीं वकीलीचा व्यवसाय थाटण्याची माझी हिंमत नव्हती आणि वकिलीला ज्या प्रकारच्या ओळखी लागतात त्या दृष्टीने बाकीचा मुंबई प्रांत मला सर्वस्वी अनोळखी होता.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .