बँकॉक ते कलकत्ता पायी प्रवास - भाग पहिला


बँकॉकच्या ग्रंथालयांतील नकाशे सर्व सयामी लिपींत असल्यानें उमगेनात. अरण्यांतील वाटांचे मार्गदर्शन करणारें इंग्रजी पुस्तकहि उपलब्ध नव्हते म्हणून प्रवासासंबंधी पूर्वयोजना तयार करणें अशक्य झाले. शेवटी वाट फुटेल तिकडे जात हिंदुस्थान गांठावें असें ठरलें. प्रवासाच्या तयारीस्तव १ नोव्हेंबर १९४५ रोजी दुपारी आम्ही बाजारहाट करावयास निघालों.

प्रत्येकाने एकेक हलकी चामड्याची वा वेताची पेटी विकत केली. टॉर्च, बॅटरीचे मसाले, आगपेट्या, टॉर्चचे एकदोन लहान कांचदीप इत्यादि सामान आम्ही विकत घेतलें. रामसिंगाचें पादत्राण प्रवासभर टिकण्याच्या परिस्थितीत नव्हते म्हणून त्यांनी नवीन जोडा घेतला. आंथरण्यास दरी, मच्छरदाणी, पांघरण्यास एक हलके कांबळे, तीन सदरे व तीन विजारी, लंगोट इ. सामान प्रत्येकाचें होतेंच. वाटेंत सामान वाहून अनेक मैल पाय चालावे लागेल अशा कल्पनेनें आम्हीं अत्यल्प सामान बरोबर ठेवलें होतें.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



अनुभव कथन

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen