त्या खेड्याच्या दिशेने आम्ही पुढे जाऊं लागलों तो आम्हाला दुरून पाहूनच लोक भयभीत होऊन पळ काढू लागले. आमच्याशी कोणी बोलायला तयार होईना. उलट आम्हीं त्यांच्याशी बोलण्यास आतुर होतो. हा प्रकार बरा नव्हें हें जाणून आम्ही एका झाडाखाली सामान ठेवून बसलो. थोड्यांच वेळांत आम्हाला मोठ्ठा हलकल्लोळ व ढोलक्याची आवाज ऐकू येऊ लागला. भाले, बरच्या, लाठ्या, काठ्या, बंदुकी, तलवारी घेऊन संबंध खेडे आमच्या रोखाने चाल करून येत होतें. आमच्या समोर एका फर्लांगांवर असलेला ओढा पार करून आमच्या बाजूस तोंड करून ओढ्याच्या उंच तीरामागे सर्व लोक दबा धरून बसले. त्यांच्या बंदूका आमच्यावर रोखल्यालेल्या होत्या.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .