येणाऱ्या लक्ष्मीच्या स्वागतासाठीं बायका सामूहिक रीत्या गायन-वादनाचे कार्यक्रम करतात. यासाठीं घरोघरीं दाराबाहेर अंगणात एक व्यासपीठ उभारण्यांत देते. या व्यासपीठाची सर्व सजावट दीपांनीं केली जाते. परंतु आंध्रांतील खेडोपाडीची दिवाळी काहीशी वेगळी असते. पैशाची कमतरता असल्यामुळे गांवकरी लोक डोळे दिपून जातील इतके दारूकाम करू शकत नाहीत. खेड्यांतून त्या दिवशीं सनकाड्यांसारख्या काड्या पेटवतात आणि त्या हातांत घेऊन गांवकरी आपल्या खेड्यांत सर्वत्र प्रकाश पसरवीत धांवत जातात. हैद्राबाद इथं दिवाळीच्या दिवशी रेड्यांच्या झुंजीचे कार्यक्रम होतात. ते पाहायला प्रचंड गर्दी उसळते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .