या भरत भुवनांत आजकाल ते एखाद्या नबाबाच्या थाटानें राहतात. त्यांच्या लिहिण्याच्या खोलींत भारतीय पद्धतीचे कलात्मक कोच आहेत. मारवाडी पद्धतीची गादी लोडांची बैठक आहे. विजेचा पंखा फिरत असतो. नोकर पान बनवून देत असतो. संगीत दिग्दर्शक पेटीवर तर्ज वाजवीत राहतो. भरतजी भराभर शब्द टाकीत असतात. पंचवीस मिनिटांत गीत सिद्ध होतें. एक सहस्त्र रुपये भरतजींच्या पदरीं पडतात. ते काव्याचे व्यापारी बनले आहेत. त्यांचा व्यापार जोरांत चाललेला आहे. ‘जरा सामने तो आजा छलिये’ या त्यांच्या गीतानें लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. ‘दो आँखे बारह हाथ'मधील 'ऐ मालिक तेरे बंदे हम' हें त्यांचें प्रार्थनागीत उत्तरेंतील शाळाशाळांतून रोज गायलें जाऊं लागलें.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .