कोणा एका राजस्थानी वितरकाच्या शब्दानें त्यांना पेशव्यांच्या पुण्याचा रस्ता दाखविला. ते पुण्याला आले आणि झेड्. अहमद यांच्या 'शालिमार' संस्थेत नोकर झाले. हुद्दा होता, 'पंडितजी !' शालिमारच्या कुटुंबकबिल्यांत तेव्हां पुष्कळच गुणी माणसे होती. जागतिक काव्यांतहि ज्यांच्या कवितेला स्थान देणें जाणकरांना भाग पडेल ते सुविख्यात उर्दू कवि जोष मलिहाबादी त्या वेळी पुण्यांत होते. 'और इन्सान मर गया' या एकाच कादंबरीनें अमर झालेले तरुण लेखक श्री. रामानंद सागर त्या वेळीं शालिमारमध्ये होते. कादंबरीकार कृष्णचंद्रहि होते. या साहित्यिक समव्यवसायिकांच्याच संगतींत भरतजींना आपल्या प्रिय विषयाचा व्यासंग आवडीनें वाढवतां आला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .