आत्मा हा सर्वव्यापी, सर्वसाक्षी आहे हे दाखवून देण्यासाठी वेदान्तात नेहमी एक उदाहरण देतात. एका गुरूने शिष्याच्या हाती एक पक्षी दिला व ‘जेथे तुला कोणी पाहत नाही अशा ठिकाणी जाऊन याला मारून टाक !’ असे त्याला सांगितले. हे काम फारच सोपे आहे असे वाटून शिष्य त्या पक्ष्याला घेऊन अरण्यात गेला. शेतकरी, शिकारी, भिल्ल, कातकरी यांनीही पाहू नये म्हणून तेथून अगदी गर्द झाडीच्यामध्ये जाऊन तो उभा राहिला. घनदाट राईमुळे तेथे सूर्यकिरणही येत नव्हते. तेव्हा कोणी पाहत नाही अशी खात्रू वाटून त्याने पक्ष्याला समोर धरले नि आता त्याची मान मुरगळणार तोच शिष्याच्या ध्यानी आले, की ‘अरे! इथे माझे हे कृत्य कुणी पाहत नाही असं कसं म्हणता येईल ? मी स्वतः ते पाहत आहेच की !’ हे ध्यानात येताच तो गोंधळून गेला. कारण आपण कोठेही गेलो तरी आपण हे कृत्य पाहणारच; आणि त्यामुळे या पक्ष्याला ‘कोणाच्याही नकळत’ मारून टाकणे शक्य होणार नाही असे त्याला दिसू लागले. त्यामुळे तो तसाच परत गेला व ‘हे अशक्य आहे’ असे त्याने गुरूजींना सांगितले. आपला आत्मा प्रत्येक ठिकाणी आपल्या कृत्याचा साक्षी आहे, या विचार शिष्याच्या ध्यानी आलेला पाहून गुरूजींना आनंद झाला. आपल्या आत्म्याच्या सर्वसाक्षीत्वाविषयी आपल्याला झालेली ही जाणीव आपण वेदान्तापुरती, परलोकापुरती मर्यादित न ठेवता, ऐहिक जीवनाच्या व्यवहारात पदोपदी जागृत ठेवावी अशी सध्याच्या समाजरचनेची अपेक्षा आहे आणि ही जाणीव आपण ठेवीत नाही हेच आपल्या सर्व दुःखाचे मूळ आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
अंतर्नाद
, चिंतन
, माझे चिंतन
Harihar sarang
4 वर्षांपूर्वीमहात्मा गांधींनी आपल्या आत्मकथेत Civil disobedience च्या भरकटलेल्या चळवळीसंबंधी लिहिताना यासंबंधी अत्यंत सुंदर विचार मांडलेले आहेत। ते मुळतूनच वाचले पाहिजेत। Part V, Chapter No. 33, chapter Name. A himalayan miscalculation
Harihar sarang
4 वर्षांपूर्वीमहात्मा गांधींनी आपल्या आत्मकथेत Civil disobedience च्या भरकटलेल्या चळवळीसंबंधी लिहिताना यासंबंधी अत्यंत सुंदर विचार मांडलेले आहेत। ते मुळतूनच वाचले पाहिजेत। Part V, Chapter No. 33, chapter Name. A himalayan miscalculation
Aparna Ranade
4 वर्षांपूर्वीसुंदर लेख
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीसुरेख लेख आणि विश्लेषण ! लेखकाने आपला मुद्या मत विस्ताराने स्पस्ट केले आहे . एवढा आदर्शवत समाज घडवायचा तर खूपच मूल्यांचा दिर्घकाळ अंगीकार करावा लागेल . अर्थात समाजात दिसणारी उथळ मूल्य पाहिली की आपला आत्मा आगोदर गळाठून जातो . तो परिस्थिती शरण केंव्हा होतो कळतही नाही . अर्थात व्यक्तिशः मला लेख खूप आवडला - एक व्यक्ती म्हणून आपण आपल्या मनाचा धाक मानलाच पाहिजे :
kiranjoshi
7 वर्षांपूर्वीवृत्ती म्हणजे दृष्टिकोन बदलला पाहिजे हे खरे पण असे नागरिक ज्यांनी प्रयत्नपूर्वक बदल केला आहे वा करत आहे त्यांना या देशाचा कायदा कितपत मान देतो? मी या देशाचे कायदे पाळतोय यात काय मोठी गोष्ट? मी माझं कामच करतोय, इतकेच नव्हे तर कायदा मोडला तर शिक्षा भोगतो...आजूबाजूला अत्यंत निराशाजनक परिस्थिती असताना सचोटीने राहणाऱ्या नागरिकांनी कायदा हातात घेऊन दुसऱ्याला सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे हे सांगावे काय?बेसुमार लोकसंख्या वाढीमुळे सार्वजनिक सेवांचे तीन तेरा वाजले असताना आपण लोकांकडून कायदा पाळायची अपेक्षा करतो? लेखात अपेक्षित असलेली समाजव्यवस्था येण्यासाठी जे स्वतः चे स्वतःला वळण लावावे लागेल ते लागण्यासाठी तरी कमीतकमी पोलीस हवा समोर...विनातिकीट जाऊ नये म्हणून तिकीट देण्याचे वेगवेगळे पर्याय उभे करा...लोक काढतील की तिकीट...आत्म्याचा आवाज ऐकणाऱ्यांची संख्या वाढेल ... समोर टी सी उभा केला तर ती संख्या अजून वाढेल. रोज तिकीट देण्याचे वेगवेगळे पर्याय कोणत्याहीवेळी तुमच्यासमोर हात जोडून उभे असतील व कोणत्याही वेळी टी सी देखील समोर दिसत असेल तर लोक तिकीट काढूनच प्रवास करतील. पण हे चित्र जर रोजच्या रोज दिसू लागले तर हळूहळू वळण लागेल की...जर सरकारी व्यवस्थेतील भ्रष्टाचार कमी झाला तर आत्म्याचा आवाज ऐकणाऱ्यांची संख्या आणखी वाढेल हे खरे. आपण जे करतो आहे ते फार मोठे चूक आहे याची जाणीव जोपर्यंत भ्रष्टाचार करणाऱ्या ला होत नाही, आणि ती जाणीव करून देणारे घटक समष्टीमध्ये असतील तर त्यांचा वापर करूया ना आपण...काय हरकत आहे? स्वतः बदलत नाही तर परिस्थिती अशी निर्माण करूया की लोक त्यांच्या आत्म्याचा आवाज ऐकायला सुरवात करतील.सुरवात प्रत्येकाने स्वतः पासून केली पाहिजे हे बरोबर पण असे करणाऱ्याला प्रोत्साहन मिळेल अशी परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी पण मी घ्यायची की व्यवस्थेने?
Smita
7 वर्षांपूर्वीखरं तर, येतं मला देवनागरी लिपीत लिहीता ...पण सराव नसल्याने जरा कंटाळा केला ...यापुढे नक्की प्रयत्न करेन ...
Smita Mirji
7 वर्षांपूर्वीधन्यवाद भिडेजी मी ती प्रतिक्रिया संगणकावरून दिली तिथे जरा देवनागरी जमलं नाही
किरण भिडे
7 वर्षांपूर्वीस्मिता जी, आपण छान प्रतिक्रिया दिली आहे. पण देवनागरीत दिली असतीत तर अधिक मजा आली असती. तुम्ही google input tool download करून घ्या. मलाही आधी मराठी टाईप करताना खूप अडचणीचे वाटायचे पण आता इतके सोपे वाटते की इतके दिवस मी हे का केले नाही असं वाटायला लागलं. बघा...काही अडचण आली तर विचारा.
Smita
7 वर्षांपूर्वी1953 madhe lihilela lekh etakya varshanantar hi titakya Ch chapakhal pane aaj chya paristhiti la lagoo hoto ...yapeksha aanakhi mothe durdaiv te Kay !!! Manacha dhak ....Uttam dhak ...he tattva joparyant aacharnat aanat nahi toparyant pharsa badal apekshit hi nahi ....