‘साष्टांग नमस्कार’ आणि आचार्य अत्रे

पुनश्च    प्र. के. अत्रे    2018-04-04 06:00:41   

अंक : केसरी दिवाळी १९६१

माझ्या लेखनाच्या सर्व प्रेरणा आणि महत्त्वाकांक्षा मी राम गणेश गडकऱ्यांकडून घेतल्या होत्या. साहजिकच, आपण नाटककार व्हावे असे मला वयाच्या सतराव्या वर्षापासून वाटत होते. शाळेत असल्यापासून मला रंगभूमीची आवड होती. अनेक नाटकांत मी कामे केली होती. त्यामुळे नाटकाचे तंत्र साधारणपणे मला माहीत होते. तथापि, तेवढ्या भांडवलावर काही मी नाटककार होऊ शकलो नसतो. गडकऱ्यांच्या सहवासात आल्यापासून माझ्या नाट्यवाचनाचे क्षेत्र जास्त व्यापक झाले. कोल्हटकरांच्या कित्येक नाटकांतील अनेक सौंदर्यस्थळे त्यांनी मला समजावून सांगितली. इब्सेनचे नाव त्यांच्याचमुळे माझ्या कानावर पडले. पण त्यावेळी इब्सेन मला समजला नाही. मात्र मोलियरची सगळी नाटके मी वाचून काढली. त्याखेरीज ‘रेस्टोरेशन’   कालखंडांतील स्टील, कॉंग्रीव्ह आणि विचर्ले ह्यांच्या ‘मरमेड सेरीज’मधील नाटकांचा मी अभ्यास केला. ती नाटके समजण्याच्या दृष्टीने सोपी होती म्हणून मला विशेष आवडली. माधवराव जोशी ह्यांच्यावर ह्या नाटकांचा फार संस्कार झाला होता. नव्हे-काही काही नाटकांतली पात्रे आणि घटनादेखील त्यांनी आपल्या नाटकांमध्ये उचलून घेतल्या होत्या. माधवरावांच्या नाटकांत कित्येकदा जी अश्लीलता आलेली आढळत होती, तो ‘रेस्टोरेशन’ कालखंडांतल्या नाटकांपासून त्यांनी मिळालेला वारसा होता.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अनुभव कथन , व्यक्ती विशेष , केसरी दिवाळी अंक

प्रतिक्रिया

  1. Sukanya Khaire

      4 वर्षांपूर्वी

    प्रेरणादायी अनुभव कथन

  2. Nishikant

      7 वर्षांपूर्वी

    बंधू भगिनींनो, हात जोडून विनंती ! मराठीत लिहा.

  3. rahulwagh

      7 वर्षांपूर्वी

    khup sundar

  4. vikastaride

      7 वर्षांपूर्वी

    Khup Chan

  5. mugdhabhide

      7 वर्षांपूर्वी

    नाटकाच्या janmachi katha mastach

  6. RaviTorne

      7 वर्षांपूर्वी

    aavda'aa

  7. harshadp

      7 वर्षांपूर्वी

    Apratim!!!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen