fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

लग्नाचा बाजार :- भाग २

अंक :- पुस्तक पंढरी ;  वर्ष :- दिवाळी अंक, १९८६

उत्तरार्ध ……..

सर्व हौसा मौजा करू पण नटवी नसावी. मुलाचे घराणे सनातनी आहे. – अशी प्रेमळ समजही एका जाहिरातीत दिलेली पाहिली. अशा सगळ्या जाहिराती वाचताना मला हमखास सखाराम बाईंडरची आठवण येते. बाई ठेवताना तो दरवेळी आपल्या नियम आणि अटी स्पष्ट करतो. ‘वर्षाला दोन लुगडी मिळतील. सणावारी एखादं जादा. एरवी पडेल ते काम करावं लागेल. माझ्याकडे कोणी भेटायला आलं तर बाईनं बाहेर आलेलं मला चालणार नाही.’ नातं वेगळं, भाषा कर्कश, दृष्टिकोन रांगडा पण वृत्ती तीच! आणि बाईंडरविरुद्ध आपण किती ओरड करतो! अशा ‘गोंधळ्या’ जाहिरातीतला अखेरचा शब्द अलीकडेच एका खास विवाहविषयक मासिकात बघितला. छापील पाऊण पाव जाहिरातीपैकी पहिले अर्धे पान वराच्या भलावणीत खर्च केलेले आहे. तो ‘पुरोगामी’ आणि क्रांतिकारी’ असल्याचा डंका तर आहेच पण त्याचं रंग, रूप, उंची, शिक्षण, क्रीडाकौशल्य, संघटनाकौशल्य, वाचन, विचार वगैरेंची तपशीलवार माहितीही आहे. त्याला स्क्वॅश हा खेळ आवडतो म्हणे. आवडू दे बापडा, वधूबद्दल लिहिताना मात्र याचं वाचन आणि विचार कसे गटांगळ्या खातात ते बघण्यासारखं आहे. हा वर म्हणतो,

‘वधूला सर्व स्वातंत्र्य दिले जाईल पण ती स्त्रीमुक्तिवादी नसावी. शिकण्याची हौस असेल तर आम्ही तिला पुढे कितीही शिकवू पण घराच्या पावित्र्याला बाधा येईल असं तिनं काही करू नये. साडीखेरीज इतर पोशाख घातले तरी चालतील, पण संस्कृतीला धक्का लागेल असे काही करू नये. इंग्रजी माध्यमात शिकलेली असली तरी चालेल, पण रोजच्या व्यवहारात तिने इंग्रजीचा थाट दाखवू नये. घराण्याची मानमऱ्यादा राखून तिने तिची शान वाढवावी.’

हे ‘हे करू नये…. ते करू नये’ इतके वेळा येतं की शेवटी याच्याशी लग्नच करू नये असं एखादीला वाटलं तरी आश्चर्य वाटू नये. मी मात्र या जाहिरातीचा सरळ अर्थ असा घेते की-

‘तिला डोकं असावं पण तिनं ते चालवू नये.’

तिनं विचार करावा पण तो लोकांपुढे मांडू नये.

तिला संवेदनाक्षमता असावी पण सासू, नवरा अशा ‘व्हायटल’ नात्यांमध्ये तिनं ती वापरू नये.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 5 Comments

  1. उद्बोधक , खूप सुंदर

  2. सुंदर

  3. positive merits

  4. Khup sunder ani barikk nirikshan ahe lekhakache. Sabhasad honyasathi apply kele ahe.

  5. खूप छान व वास्तव

Leave a Reply

Close Menu