प्रास्ताविक


अंक- अंतर्नाद; वर्ष- दिवाळी २०११ लेखक: दत्तप्रसाद दाभोळकर मी कवी आहे, असे मी समजतो. भोवतालचे कोणीही असे काही समजत नाहीत, हेपण मी समजून आहे! मी कवी आहे, असे मी समजतो, यालाही कारण आहे. ‘कवितारती’ हे कवितेला वाहिलेले मराठीमधील एकमेव मासिक आहे. गेल्या वर्षी त्या मासिकाने आपला ‘रौप्यमहोत्सव’ साजरा केला. त्या मासिकात सलग पंचवीस वर्षे दिवाळी अंकात माझी कविता असते. कविता असते, यालाही कारण आहे. दरवर्षी दिवाळीला दोन-तीन महिने असताना मासिकाचे संपादक प्र. पुरुषोत्तम पाटील यांचे आग्रहाचे पत्र यायचे - ‘‘तुमच्या कवितेशिवाय आमचा दिवाळी अंक संपन्न होणार नाही. कविता पाठवा.’’ माझी आणि प्रा. पुरुषोत्तम पाटील यांची तोंडओळखसुद्धा नव्हती. ती झाली चार-पाच वर्षांपूर्वी. गेल्या वर्षी पंचवीस वर्षांतील ‘कवितारती’मधील शंभर निवडक कवितांचा त्यांनी संग्रह काढला, त्यातही त्यांनी माझी कविता घेतली. आता हे एवढे, मला माझ्यापुरते, मी कवी आहे असे समजण्यास पुरेसे आहे! पण खरी अडचण पुढची आहे. साताऱ्यासारख्या छोट्या शहरातसुद्धा मी कवी आहे, असे कोणी चुकूनही समजत नाही. मोठी कविसंमेलने राहू द्या, अगदी गावातील कविसंमेलन असले, तरी मला कुणी बोलवत नाही! माझ्या जवळच्या मित्रांनाही मी कविता करतो असला काही संशय नाही. ते राहू द्या, मी अगदी हट्टाने माझ्या मुलीला कॉन्व्हेंटमध्ये न घालता, मराठी माध्यमाच्या शाळेत घातले होते. पण तिला जर कुणी सांगितले, की मी कविता करतो, तर ती म्हणेल, ‘‘नॉनसेन्स! असले काही करत वेस्ट करण्याएवढा टाइम माझ्या डॅडकडे नाही!’’ आणि अगदी खासगीतले सांगतो, इतर (अगदी साध्यासाध्या!) मासिकांच्याकडून माझ्या कविता ‘साभार परत’ पण येत असतात! सांगण्याचा मुद्दा वेगळा. ‘अंतर्नाद’च ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद , कविता रसास्वाद , दत्तप्रसाद दाभोळकर

प्रतिक्रिया

  1. sakul

      7 वर्षांपूर्वी

    दत्तप्रसाद दाभोळकर... विषय कोणताही असो, किती सुरेख लिहितात. लिहितात म्हणजे लिहायचं म्हणून नाही, तर प्रत्येक विषयात शिरून. मर्मग्राही!

  2. asmitaph

      7 वर्षांपूर्वी

    Very nice article. Didn't feel that it was published few years back at all.

  3. VijayGokhale

      7 वर्षांपूर्वी

    Fully agree with opinikn expressed by Mrudula

  4. shubhadabodas

      7 वर्षांपूर्वी

    कवितेसंदर्भातला अतिशय सुंदर लेख! त्याखालील कविता पण अप्रतिम! सर्व संग्रह नक्की वाचला पाहिजे .

  5. asiatic

      7 वर्षांपूर्वी

    सुंदर. मीरा सहस्त्रबुद्धे यांच्या कवितेची पुनर्भेट आनंददायी होती. दाभोळकर यांच़ा मनःपूर्वकतेने लिहिलेला लेखही छान.

  6. sudhirdnaik

      7 वर्षांपूर्वी

    Whenever I see heads deep into a mobile, rather than in a book, I realise that a long term solution to get the thinking readers back into appreciating the "good" rather than the frivolous is something that YOU are doing. Well done. Keep at it. It's a long and arduous task but delightful!!

  7. शरद कांबळे

      7 वर्षांपूर्वी

    कवितारती हे मासिक प्रा.पुरूषोत्तम पाटील धुल्याहून काढीत ते आम्हाला महाविद्यायात मराठी शिकवित ते गाजलेले कवी होते ते नुकतेच वयाच्या 92/93वर्षी वारले

  8. shubhada.bapat

      7 वर्षांपूर्वी

    मस्तच. मिराताईंच्या कवितांचे पुस्तक प्रकाशित झालेल्याचे नाव कळेल का?

  9. maheshbapat63

      7 वर्षांपूर्वी

    खुपच छान लेख आणि त्यानंतर कविता म्हणजे सोने पे सुहागा

  10. ulhas

      7 वर्षांपूर्वी

    कवित्वा पासून कवितांच्या निवडी पर्यंतचे कोडे ललित अंगाने छान व सोपे करून सांगितल्याबद्दल आभार!अनेक मान्यवरांच्या बरोबर झालेली चर्चा नमूदकेल्याने लालित्या बरोबर समजही वाढते. शेवटची " प्रकाशयात्री "कविता भावली.

  11. drvyankatesh

      7 वर्षांपूर्वी

    खूपच छान दाभोलकर स्वतःच्या कवितेच इतकं सविस्तर रसग्रहण करताहेत हे प्रथमच वाचण्यात आल आपल्या उपक्रमाच कौतुक कराव तेवढं कमीच आहे

  12. Makarand

      7 वर्षांपूर्वी

    लईच भारी. दाभोळकरांनी कवितेचं व्याकरण कवितेसारखंच अलवारपणे उलगडलं आहे. आपण कविता करतो असं ज्याला ज्याला वाटतं त्याने त्याने हे वाचायलाच पाहिजे.

  13. किरण भिडे

      7 वर्षांपूर्वी

    खूप धन्यवाद. कष्टाचं चीज झालं आणि अजून कष्ट करायचा हुरूप आला. कधी काही आवडलं नाही तरी कळवत जा...

  14. Mrudula

      7 वर्षांपूर्वी

    असं काही वाचायला मिळालं की ' पुनश्च 'चे सभासद झाल्याबद्दल कृतार्थ वाटतं. आपण आमची अभिरुची बरोबर ओळखली आहेत याचंच हे निदर्शक आहे. असे लेख शोधून काढणं हे किती कष्टाचं काम आहे याची कल्पनाच करू शकत नाही. खूप खूप आभार.

  15. bookworm

      7 वर्षांपूर्वी

    सुप्रभात! फारच छान कविता! प्रकाश यात्री विशेष आवडली! उत्तम!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen