राष्ट्राच्या राजकारणातही पाय पसरण्याची पठाणी वृत्ती अन् अंग चोरून बसण्याची हिंदु वृत्ती या दोन वृत्ती संभवतात. या हिंदु वृत्तीलाच दलवाई यांनी आकुंचनवादी वृत्ती म्हटलं आहे. पण त्यांनी दोष पुढाऱ्यांना दिलेला नसून, त्या पुढाऱ्यांना योग्य क्षणी हाकून न देणाऱ्या जनतेला दिला आहे. हिंदुसमाज आज चैतन्यहीन झाला आहे. अन् म्हणून त्यानं निवडलेलं सरकार हे आज पडखाऊ अथवा Defeatist असणारच, असा दलवाई यांचा ‘ थीसिस ’ आहे. दलवाई इथेच थांबत नाहीत, ते खरे राष्ट्रवादी असल्यानं, हिंदुसमाजात चैतन्य आणण्याकरिता काय केलं पाहिजे हे सांगायलाही ते भीत नाहीत. आमच्यातील काही शहाणे त्या विश्लेषणाकडे काणाडोळाही करतील. पण एक मुसलमान लेखक हिंदु-मुसलमान दोन्ही समाजांची इतराजी पत्करून हे विचार तळमळून मांडतो, हे नवीन खास आहे...आचार्य अत्रे यांच्या 'मराठा' मध्ये दोन लेख लिहून दलवाई यांनी केलेल्या विश्लेषणावर समीक्षक श्री. के. क्षीरसागर यांनी केलेली ही मार्मिक टिप्पणी- ******** ‘ थीसिस ’ हा शब्द मी या ‘संवादांत’ कम्युनिस्ट मंडळी वापरतात, त्या अर्थाने वापरीत आहे. कम्युनिस्ट लोक भावी धोरण ठरविण्याकरिता जेव्हा जमून आपसांत चर्चा करतात. तेव्हा त्यांच्यातील काहीजण आपले विचार आणि विश्लेषण ‘प्रबंध’ रूपाने पक्षापुढे मांडतात. त्याला ते ‘थीसिस’ म्हणतात. तरुण मुसलमान लेखक हमीद दलवाई यांनी आचार्य अत्रे यांच्या मराठ्यात अलीकडे जे दोन महत्त्वाचे लेख लिहिले आहेत, त्यांना माझ्या मते अशा ‘थीसिस्’चेच स्वरूप असल्यानं, मी तो खास राजकीय शब्द वापरीत आहे. नाही तर कुणाला वाटायचं की, तरुण हमीद दलवाई ‘पीएच्.डी.’ला बसत आहेत! हमीद दलवाई यांना आज बड्या पुढाऱ्यांत-वा बड्या लेखकांतही-स्थान आहे, असं मला वाटत नाही. त्यांचे विचार मु ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
सशुल्क
, समाजकारण
, हमीद दलवाई
, माय मराठी
, शरच्चंद्र चट्टोपाध्याय
, श्री.के. क्षीरसागर
JAYANT PRABHUNE
3 वर्षांपूर्वीमुस्लिमांपेक्षा हिंदू तील जयचंद याला जबाबदार आहे
deepa_ajay
7 वर्षांपूर्वीis it possible to get original atr's editorial
किरण भिडे
7 वर्षांपूर्वीतुम्हाला ज्यांच्यापर्यंत हा लेख पोचवायचा आहे त्यांना सभासद होण्याची लिंक पाठवा ना( www.punashcha.com/subscribe )...सभासद होऊनच त्यांना हाच का? सगळेच लेख वाचू द्या. मुद्दाम फक्त १०० रुपये असे नाममात्र वार्षिक शुल्क आपण घेतो जेणेकरून पैशाअभावी कोणा वाचकाला चांगल्या साहित्यापासून लांब राहायला नको. आपले काय मत?
vijaykaranjekar
7 वर्षांपूर्वीसुंदर लेख. कॉपी पेस्ट करून फेसबुक वर टाकण्याची परवानगी आहे का?
vasantdeshpande
7 वर्षांपूर्वीकिती अचूक विश्लेषण आहे दलवाईंचं! आज पन्नास वर्षे झाली, दलवाई म्हणतात त्याप्रमाणे जनतेने शासनही बदलून पाहिले. पण फरक काय झाला? आजही रमजानचं निमित्त करून भाजपाच्या सरकारनं घातकी अतिरेक्यांपुढे (पाकिस्तानच्या हस्तकांपुढे) लोटांगण घातलेच आहे. काल पहिल्यादिवशीच एक जवान आणि चार नागरिकांचे बळी पडलेच आहेत. याशिवाय कधी नव्हे ते लष्कर, सीमासुरक्षादल आणि पोलिस यांच्या एकत्र कारवाईची फळे दिसत असताना कारवाई थांबविण्याचा निर्णय घेण्यात आलाच ना? खरोखर आकुंचनवादी वृत्ती हेच आपले भागदेय आहे !
bookworm
7 वर्षांपूर्वी१९६०/७० च्या दशकात सदर लेखन आपल्याला घेऊन जातं पण सध्याच्या वातावरणाशी तुलना करण्याचा मोह मात्र आवरत नाही. लेखाच्या निवडीसाठी दाद दिली पाहिजे.