साठा उत्तरांची कहाणी

पुनश्च    सुभाष भेंडे    2018-05-26 06:00:34   

लेखक- सुभाष भेंडे ; अंक- दीपावली; वर्ष - १९७०

विनोद गंभीर असतो? की तो हसवणारा असतो? प्रश्नाचं उत्तर सोपं आहे असं आपल्याला वाटेल परंतु ते तसं नाही. सुभाष भेंडे यांनी ४८ वर्षांपूर्वी लिहिलेला हा विनोदी लेख म्हणजे या प्रश्नाचं नमुनेदार उत्तर आहे. त्यांनी दिलेलं उत्तर तेव्हा शंभर टक्के खरं होतं आणि आता ते दोनशे टक्के खरं आहे. एक संपादक मासिक काढतो, ते बंद पडतं, तो परत नवं मासिक काढतो,तेही बंद पडतं. मग तो एका अनुभवी संपादकाकडे सल्ला विचारायला जातो...त्या दोघांचा संवाद एवढा विनोदस्फोटक आहे की आपण जाम गंभीर होतो आणि एवढा गंभीर आहे की आपलं जाम हसून हसून मुटकुळं होतं...वाचाच ही साठा उत्तरांची कहाणी

. ********

आटपाट नगर होतं. तिथं एक माणूस रहात होता. घरचा मोठा गब्बर होता. वडिलार्जित इस्टेट होती; पण नोकरीचाकरी काही नव्हती. दिवसभर खावं-प्यावं; सकाळ-संध्याकाळ भटकत सिनेमा-नाटकं पहावीत-असं आयुष्य चाललं होतं. एक दिवस भल्या सकाळी त्यानं ठरवलं-आपण एक मासिक काढायचं. उच्च अभिरुचीला वाहिलेलं. विचारपरिप्लुत (की लुप्त?) असं. संपादक म्हणून मिरवायला मिळेल. पत्रकार परिषदेला जायला मिळेल. परदेशी वकीलातीत जाऊन परदेशी मद्य प्यायला मिळेल. मग त्यानं ‘ज्ञानपिपासू’ मासिक काढलं. जाडे जाडे विद्वान गोळा केले. त्यांच्याकडून लेख लिहवून घेतले. ‘सौंदर्यशास्त्र आणि उत्क्रांती’,‘हेगेलची कलाविषयक उत्पत्ती ’, ‘अस्तित्वाचे नवे भान’, ‘ज्ञानेश्वरीतील ङ’ असे लेख प्रसिद्ध होऊ लागले. पचायला मोठे जड-पण समाजाचं आरोग्य सुधारतील असे. जनतेच्या दृष्टीची क्षितिजं रुंद करणारे. त्यांच्या चिंतनाला खाद्य पुरविणारे. वर्ष गेलं-दीड वर्ष गेलं. मासिक काही खपेना. शंभरएक वर्गणीदार मिळेनात. लोकांनी हाय खाल्ली. अंकांची थप्पी लागली.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विनोद , दीपावली , सुभाष भेंडे

प्रतिक्रिया

  1. sudhirdnaik

      6 वर्षांपूर्वी

    kya baat hai!

  2. bookworm

      6 वर्षांपूर्वी

    व्वा! धम्माल! सर्व सामान्य वाचकाला आणखी काय हवं असतं? तिरक्या नजरेने छान फिरकी घेतलीय...!

  3. Makarandswami

      6 वर्षांपूर्वी

    Subhash Bhende has a unique style of writing. He would write for Awaaj dipavali .Most of the times he has written on Romance .

  4. smanisha

      6 वर्षांपूर्वी

    Wonderful ?



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen