व्हिलन

पुनश्च    दि. बा. मोकाशी    2018-05-16 06:00:23   

आठवड्यानंतर सोनी खूपच मोकळी वागू लागली. माझ्याजवळ बसण्या-उठण्यातला संकोच गेला. गॅलरीत उभं राहिल्यावर ती मोकळेपणानं खेटून उभी राही. आमच्यात खरी मैत्री झाली होती. तिथून कुठं दुसरीकडं जाण्याचं मनात आलं की हात ओढून ती म्हणू लागली होती, “चल! कैऱ्या पाडायच्या का?” एकदा गॅलरीत उभं असता ती म्हणाली, “तू आल्यामुळंच मी इथं येऊन उभी राहू लागले. गेले चार महिने गॅलरी मी बंद केली होती.” मी विचारलं, “का?” ती म्हणाली, “हळूच डावीकडे मान वळवून पाहा. पाहातोस असं दाखवू नको.... ******** बाबांच्या मित्रांना मी काका म्हणत असे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी दोन वेळा काकांच्या गावी गेलो होतो. एकदा आठ वर्षांचा असताना. दुसऱ्यांदा सोळाव्या वर्षी. आधी कित्येक दिवस काका आले की बाबांना म्हणत होते, “उन्हाळ्यात बबनला आमच्याकडे पाठव. सोनी आहेच. दोघं खेळतील.” शेवटी बाबा मला पाठवायला तयार झाले. पहिल्या वेळी काकाच स्वतः येऊन मला घेऊन गेले. दुसऱ्या वेळेला मी त्यांच्या गावी गेलो तेव्हा एकटाच गेलो. दुसऱ्या वेळी गेलो तेव्हा पहिल्यावेळचं फार पुसट आठवत होतं. काकांच्या घराभोवतालची मोठाली झाडं. सर्वत्र पडलेला पाचोळा. “सांभाळून रे!” पाचोळ्यातून धावताना सोनी मला ओरडली होती. काटा टाळण्यासाठी, सबंध पाऊल न टेकता चवड्यावर कसं धावायचं, तिनं धावून दाखवलं होतं. घराच्या गॅलरीतून दिसणारं रस्त्यापलीकडचं तळं मला आठवत होतं. तळ्याच्या पाण्याला झाकीत कमळाच्या पानांच्या पत्रावळी पसरल्या होत्या. ती तिरपी-आडवी पानं, उमललेली नि उमलायची कमळं, पानांवर अलगद बसणारा बगळा, या साऱ्यांनी मला, पाटीवर मी सरस्वतीचं चित्र काढीत असे त्याची आठवण करून दिली होती. सोनीनं मला बोट धरून घरभर धावडत नेलं होतं-मोठ्या काळोख्या मा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


सशुल्क , कथा , व्हिलन

प्रतिक्रिया

  1. MADHAVIMD

      5 वर्षांपूर्वी

    मस्तच मनापासून धन्यवाद

  2. sudhirdnaik

      6 वर्षांपूर्वी

    Often we experience such events. And we forget them. And suddenly we remember them again. A character like Soni is always hidden in our memories. Di Ba. had a great ability to narrate such simple events. Thanks Punasch for allowing us to enjoy after 48 years such a simple but heat warming story. Sudhir Naik

  3. shubhadabodas

      6 वर्षांपूर्वी

    खूप वर्षांनी ह्या वळणाची गोष्ट वाचली, आवडली

  4. शरद कांबळे

      6 वर्षांपूर्वी

    सुंदर कथा ग्रामीण भागाचे वर्णन त्या काळात अलगद घेऊन जाते क्या बात है

  5. sureshjohari

      6 वर्षांपूर्वी

    मस्तच . आवडले

  6. surekhasarfare

      6 वर्षांपूर्वी

    अतिशय आवडले. दी बा मोकाशीचे अजूनही साहित्य पुनश्च वर देत रहावे. धन्यवाद.

  7. aghaisas

      6 वर्षांपूर्वी

    सुंदर! सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. खास करुन सायकल शिकविण्याचा प्रसंग हुबेहुब रंगवला आहे. आपण मोठे झालो की लहानपणी बघितलेल्या गोष्टी लहान वाटू लागतात हेही अनुभवलेलं आहे. सोवळी बाई वगैरे गोष्टी आता राहिल्या नाहीत. तसेच साडीही कालबाह्य होऊ लागली आहे. खूप छान लेख!

  8. ajitpatankar

      6 वर्षांपूर्वी

    वाह ! क्या बात है ! मस्तच.....

  9. Meenalogale

      6 वर्षांपूर्वी

    अप्रतिम,दि बा मोकाशींची शैली आणि आशय दोन्हीं सुंदर.अशा उत्तम कथा अजून वाचायला आवडतील.धन्यवाद.

  10. vasant deshpande

      6 वर्षांपूर्वी

    आवडली कथा. मोकाशींबद्दल वाचलं होतं पण त्यांचं लेखन वाचायचं राहून गेलं होतं. साध्या घटना सांगत छान रंगवलेय कथा. कोणताही फॉर्म्युला न वापरता स्मरणात राहील असे लेखन आहे . त्याचं लेखक म्हणून मोठेपण पटवणारं.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen