सर्वव्यापी कंटाळा

रोज तेच तेच काम करून अमर कंटाळला होता,रजाही शिल्लक होत्या. त्यामुळे सलग चार दिवस सुटी घेऊन अमरचे कुटुंबिय कोठेतरी फिरायला जायचे ठरवित होते पण मुलांचे क्लासेस असल्याने ते शक्य झाले नाही. तरीदेखील त्याने रजा घेतलीच. रजेच्या तिसऱ्या दिवशी अमर कंटाळला  होता. टाईमपास म्हणून त्याने टी.व्ही. सुरु केला. सर्व चॅनेल सर्फ करून झाली, न्यूज चॅनेल्स त्याच त्या बातम्या ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवित होती. मराठी चॅनेलवर दुसऱ्या नवऱ्याची तिसरी बायको चौथ्या मित्राशी कारस्थान रचत होती. अमर वैतागला, त्याने एक शिवी घालून टीव्ही बंद केला आणि तो मोबाईलवर पोस्ट पाहू लागला. थोड्याच वेळात त्याला त्याचाही कंटाळा आला. अमरची तिसरीतील मुलगी तर नेहमीच बोअर झालेली असते. एक गेम खेळू लागली कि दहा मिनिटात ती बोअर होते आणि दुसरा गेम शोधू लागते. तिला तर जेवणाचा देखील कंटाळा येतो मग तीची आई तिला जबरदस्तीने भरवत असते. तिलाही मुलांच्या वागण्याचा कंटाळा येतो, पण कुठे फिरायला जायला देखील ती गर्दीमुळे कंटाळली आहे. सध्या कंटाळा सर्वव्यापी झाला आहे. कोट्यावधी रुपयांची एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीज हा कंटाळा, बोअरडम दूर करण्यासाठीच काम करते आहे. गंमत म्हणजे दुसऱ्यांचा कंटाळा दूर करण्यासाठी या इंडस्ट्रीजमध्ये काम करणारी माणसेही स्वतः कंटाळत असतात. तो कंटाळा घालवण्यासाठी पार्ट्या करतात, ड्रिंक्स घेतात, नवीन सेक्स पार्टनर शोधतात, हरणांची शिकारसुद्धा करतात.

का येतो असा कंटाळा? त्याचे  कारण मेंदूत आहे का या प्रश्नाचे उत्तर शास्त्रज्ञांना गवसले आहे. या बोअरडमवर विजय मिळवायचा असेल तर कंटाळा येतो त्यावेळी मेंदूत काय घडते, हे प्रमाण कमी करायचे काही उपाय आहेत का हे समजून घ्यायला हवे.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 5 Comments

  1. rupali

    respected sir i am reader of your blog and each one is best of best.all of are full of scientific information

  2. sureshjohari

    आवडला

  3. bookworm

    लेख मात्र अजिबात कंटाळवाणा नव्हता.

  4. निशिकांत

    प्रिय यशवंतराव,
    आळस झटकून जास्तीत जास्त शब्द मराठीत
    लिहिण्याचा कंटाळा केला नाहीत.
    आभार.

    1. Dr Yash Welankar

      निशिकांत राव,तुमचा इंग्रजी शब्द टाळण्याचा आग्रह योग्य आहे।पण मेंदू विज्ञानातील संशोधन इंग्रजी मधूनच प्रसिद्ध होत असते आणि मेंदूतील विविध भागांना दिलेली नावे किंवा रसायनांची नावे इंग्रजीत असतात।प्री फ्रंटल कोरटेक्स याला मेंदूचा सर्वात पुढील भाग असे म्हणता येईल पण डिफॉल्ट मोड नेटवर्क याला किंवा सिंग्यूलेट कोरटेक्स याला मराठी शब्द कोणते वापरणार?
      माझी तुम्हाला विनंती आहे की लेखाचा मतितार्थ समजून घेऊन त्यावर काही प्रश्न विचारा।
      मी मराठी शब्द लिहिण्याचा आळस करीत नाही म्हणूनच सर्जनशीलता हा शब्द वापरतो।पण बोजड मराठी शब्दांपेक्षा प्रचलित इंग्रजी शब्द वापरले तर लेखन समजायला सोपे जाते असे वाटते।लोकांना रक्तदाब शब्दांपेक्षा ब्लडप्रेशर शब्द अधिक सोपा आणि परिचित वाटतो।त्यामुळे मी ते दोन्ही शब्द वापरतो।
      तुम्ही आवर्जून लेख वाचता आणि अभिप्राय लिहिता यासाठी हार्दिक धन्यवाद।पण
      इंग्रजी शब्द किती आहेत ह्याचा विचार करण्याऐवजी नवीन विचार काही कळला का याला अधिक महत्व द्यावे एवढीच नम्र विनंती।

Leave a Reply