अंक- मौज; वर्ष- १९८८ दुसऱ्या भागात आपण वाचलं की १९८८ जूनअखेरची पार्टी परिषद अत्यंत यशस्वी झाल्याचे डिंडिम वाजविण्यात आले तरी परिषदेनंतर लगेच विरोधकांनी आपल्या छुप्या विरोधाची मोहीम उघडपणे सुरू केली. यात गोर्बाचेव यांच्यानंतर क्रमांक दोनचे पुढारी येगोर लिगाचेव यांचाच मोठा पुढाकार आहे. गेली दोनतीन वर्षे पॉलिट ब्यूरोपर्यंतच आपला विरोध मर्यादित ठेवण्याचा संयम त्यांनी सोडून दिला असून परिषदेत फक्त काही प्रमाणात उघडपणे झालेला विरोध, परिषद संपताच ठिकठिकाणी होणऱ्या सभा-परिषदांतून आणि प्रसारमाध्यमांतून मोठ्या प्रमाणात व्यक्त होऊ लागला. आता पुढे=> या विरोधाला लवकरच संघटित स्वरूप येण्याची चिन्हे दिसू लागताच गोर्बाचेव सावध झाले आणि विरोधकांना कोणकोणती वृत्तपत्रे व नियतकालिके विशेष अनुकूल आहेत याची आपण नोंद घेत आहोत, असे त्यांनी रागाच्या भरात जाहीरपणे सांगून टाकले! गोर्बाचेव यांच्या नव्या सुधारणांच्या कार्यक्रमाला ‘दुसरी क्रांती’ व गोर्बाचेव स्वतः हे ‘दुसरे लेनिन’ असल्याची प्रशस्ती एका बाजूला सुरू झाली असतानाच दुसरीकडे विरोधाचे व वरिष्ठ पातळीवरील सत्तास्पर्धेचे राजकारणही तापत जालले. जुलमी व अत्याचारी राजवटीचा स्तालिनवाद त्याज्य असला तरी स्तालिनने या मागासलेल्या राष्ट्राला अवघ्या दहा-बारा वर्षांत सामर्थ्यशाली राष्ट्र बनविले, हिटलरच्या आक्रमणाला समर्थपणे तोंड देण्याइतके प्रभावी नेतृत्व दिले, या स्तालिनच्या पराक्रमाचा विसर पडून चालणार नाही, अशी भूमिका घेऊनही टीकाकारांनी गोर्बाचेव यांच्यावर हल्ले चढविण्यास सुरुवात केली. तसेच भ्रष्टाचारविरोधी मोहिमेच्या प्रारंभी ब्रेझनेव यांचे कुटुंबीय व जामात चोर्बोनोव यांच्यावर लक्षावधी रुबल्सची लाच खाल्ल्याचे आरोप ठेव ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .