उंदीर आणि आपण एकाच घरात नांदत असतो. आपली इच्छा असो वा नसो. गणेशोत्सवाचे दहा दिवस केवळ तो निर्धास्त असतो, एरवी आपण त्याला घरातून हाकलण्याचे सर्वतोपरी उपाय करत असतो. परंतु खुद्द बुद्धिदात्याच्या सहवासात राहून त्याची बुद्धी घासून पुसून लख्ख झाालेली असते. प्राणीविश्वाचे अभ्यासक मनोहर दातार यांनी या लेखात उंदराच्या बुद्धीकौशल्याचे अनेक मनोरजंक दाखले अतिशय प्रवाही भाषेत दिलेले आहेत. सृष्टीज्ञान या मासिकाच्या नोव्हेंबर १९७५च्या अंकातून हा लेख घेतलेला आहे. सृष्टीज्ञान हे गेली ९० वर्षे अविरत सुरु असलेले मराठीतले एकमेव विज्ञानविषयक मासिक. प्रा. गोपाळ परांजपे, डॉ. वि. ना. भाजेकर, प्रा. प्र. रा. आवटी, प्रा. दिनकर धोंडो कर्वे , स. बा. हुदलीकर, प्रा. श्री. ल. आजरेकर आणि शं. ब. सहसबुद्धे यांनी ते एप्रिल, १९२८ मध्ये पुण्यात सुरु केले. ********** ‘श्रीगजाननाने आपले वाहन म्हणून मूषकाची केलेली निवड मान्य करण्यापूर्वी तू मला थोडी बुद्धी दे अशी अट मूषकाने घातली असावी आणि गजाननाने मूषकाच्या या साध्या अटीला तात्काळ मान्यता दिलेली दिसते. एरवी मूषकाच्या या छोट्या मूर्तीने, स्वत:ला धोरणी, कावेबाज व बुद्धिमान समजणाऱ्या माणसाचा सहज पराभव कसा केला असता?’ मूषकाला शत्रू अनेक. मांजर, साप, बेडूक, कावळा, घुबड, पिंगळा, मुंगूस, कोल्हा, गरुड असे एक ना दोन असंख्य शत्रू मूषकाला आहेत. या शत्रूच्या तडाख्यातून मूषक सुटलाच, तर माणूस त्याचा सारखा संहार करीत असतो आणि माणसाच्या तावडीतून तो सुटलाच, तर स्वत: मूषकच मूषकाला खाण्यास कमी करीत नाही. शत्रूंची ही लांबचलांब मालिका पाहिल्यावर वाटते की हा मूषकबाबा नष्ट कसा होत नाही! पण मूषक नुसता जगत नाही तर असंख्य प्राण्यांना ठार करून त्यांच्या छातीवर पाय रोवून
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Chandrakant Chandratre
4 वर्षांपूर्वीरंजक व अनोळखी माहिती.
Sadhana Anand
4 वर्षांपूर्वीउंदीर इतका बुध्दिमान असेल अस कधी वाटल नव्हत.
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीखूपच मनोरंजक ! आमच्या चौथीच्या पुस्तकात उंदराच्या चातूर्याचा धडा आहे : भज्याचा प्रसंग वाचल्यावर मला तो आठवला . छान माहिती मिळाली .
Priyanka Borphale
4 वर्षांपूर्वीनवलच!मनोरंजक माहिती
pgambekar16@
7 वर्षांपूर्वीउंदीरांबद्दल छान माहिती
asmitaph
7 वर्षांपूर्वीSuperb informative article .
sureshjohari
7 वर्षांपूर्वीखूपच छान माहीती आवडली
RJDHAPTE
7 वर्षांपूर्वीVery interesting..
sugandhadeodhar
7 वर्षांपूर्वीउंदीर धान्य साठा करतात हे माहीत नव्हते आकारावरून परीक्षा करु नये
manjiriv
7 वर्षांपूर्वीमूषक पुराण भारीच. लेख आवडला.
ssaptarshi
7 वर्षांपूर्वीमनोरंजक माहिती! आता कळले Ratatouille हा सिनेमा फ्रेंच पार्श्वभूमीवर का बनला आहे !
sandeepkamble
7 वर्षांपूर्वीउंदरांबद्दल नवीन माहिती मिळाली.
vaishalichavan
7 वर्षांपूर्वीफारच छान..
drvyankatesh
7 वर्षांपूर्वीखूपच छान माहीती उंदीर धान्याचे गोदामे नष्ट करतात हे वाचल होत आपण जितके उन्दिराला मारण्याचे प्रयत्न करू तेवढे ते हुशार होणार होतात विषारी औषध घालून भजे घरात ठेवल्यास एकदा जातील पन्हा तोन्डही एक वणार नाहीत पिन्जरा ठेवा चुकून एकदा अडकली पुन्हा फिरकतही नाही असो हे मूषक प्राण आवडल
monginis
7 वर्षांपूर्वीekdum bhari ani khari vastusthiti
swatisandaw
7 वर्षांपूर्वीखूप मजेशीर माहिती.
rajashreejoshi
7 वर्षांपूर्वीउंदराबद्दल फारच आश्चर्यकारक आणि रंजक माहिती आहे ही
bookworm
7 वर्षांपूर्वीउंदीर एवढा बुद्धिमान असतो हे माहिती नव्हतं! मला हा प्राणी अजिबात आवडत नाही. हां....मांजर मात्र आता उंदराला मारत नाही.हे बदल उत्क्रांतीमुळे होत आहेत काय? असे आश्चर्यकारक बदल आणखी कुठल्या प्राण्यांत झाले आहेत का? वाचायला आवडेल!
Aashokain
7 वर्षांपूर्वीमूषकाच्या बुद्धीचातुर्याला प्रणाम! खरोखरच माहितीपूर्ण लेख!