अंक-चित्रमयजगत्; वर्ष- ऑक्टोबर १९६३ (दिवाळी अंक) मौखिक परंपरेतून जपला जाणारा इतिहास बहुधा भ्रामक, खोटा अथवा अतिरंजित असू शकतो. तर लेखी पुराव्यांमधून सिद्ध होणारा इतिहास अनेकदा अडचणीचा असतो आणि मौखिक इतिहासाला छेद देणारा असतो. खरा इतिहासकार कुणाच्या रागा लोभाची पर्वा न करता असे पुरावे समोर मांडतो आणि त्यासाठी दिवसरात्र कष्ट घेतो. महाराष्ट्रातील अशा इतिहासकारांच्या परंपरेतलं एक मोठं नाव म्हणजे सेतुमाधवराव पगडी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि त्याआधी मोगलांच्या कारभारामुळे फारसी-उर्दू ही शासकीय व्यवहाराची भाषा होती. शिवाजी महाराजांनी मराठीचा वापर वाढवण्यावर भर दिला तरी एकूण कारभारावर फारसी शब्दांचा प्रभाव होताच. कारभाराचा एक भाग म्हणून त्याकाळी लिहिली गेलेली पत्रे हा मोठाच खजिना आहे आणि संशोधक त्यासाठी सतत दफ्तरे धुंडाळत राहिलेले आहेत. शिवाजीच्या पत्रांचा संग्रह असलेले एक हस्तलिखीत इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांना मिळाले, त्याची त्यांनी प्रत करवून घेतली. मात्र त्यातली पत्रे शिवाजीच्या काळातली असली तरी सगळी शिवाजीने लिहिलेली नाहीत. त्यातील काही फारसी पत्रांचा हा मराठी अनुवाद पगडी यांनी केला आहे. ( मूळ प्रसिद्धी दिपावली अंक, १९६३) छत्रपती शिवाजी हे केवळ कुशल लढवय्ये नव्हते तर ते तेवढेच मुत्सद्दी राज्यकर्ते होते हे या पत्रांवरून प्रकर्षाने लक्षात येते. औरंगजेबाने जिझिया कर लागू केल्यावर महाराजांनी लिहिलेल्या पत्राचा अनुवाद त्यादृष्टीने अभ्यास करण्यासारखा आहे. उपहास, विनोद, स्वतःच्या क्षमतेबद्दलचा विश्वास आणि इतिहासाचे आकलन हे सर्वच त्यात दिसून येते-शिवाजी महाराजांसंबंधीचा काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पत्रव्यवहार
लंड ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Nikhil0803
7 वर्षांपूर्वीफारच छान लेख! या लेखामुळे त्या काळातल्या बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. एक सुचवू इच्छितो, जर या अनुवादाबरोबरच तुम्ही जर मूळ पत्रातील मजकूर त्या वेळेच्या भाषेत जसे आहे तसे जर जोडले तर ती भाषा समजून घेण्यास अधिक मदत होईल.....
jaydesai
7 वर्षांपूर्वीधन्यवाद....आवडली पत्रं. त्या काळात जाऊन आल्यासारखं वाटलं.
patankarsushama
7 वर्षांपूर्वीखूप छान पत्रे आहेत भाषाही (मराठी) समजेल अशी आहे
sharadnaik
7 वर्षांपूर्वीवा! महाराजांचे शेवटले पत्र तर अफलातून!
amarpethe
7 वर्षांपूर्वीवाह, लेख वाचून आपसूकच शिवाजी महाराज की जय असे उद्गार मनात आले छान माहिती
Rajrashmi
7 वर्षांपूर्वीकोणत्याही काळात शत्रूला शमवण्यासाठी शस्त्राबरोबर लेखणीही तेव्हडिच धारधार हवी, हेच पटते
किरण भिडे
7 वर्षांपूर्वीकधी आणि कसे पैसे भरले होते?
Lgajanan
7 वर्षांपूर्वीमी रु 100 भरून सदस्यत्व घेतले होते. परंतु आज लॉगिन करताना परत रु 100 भरून सभासद होण्यास सांगितले जात आहे. काय कारण आहे?
raginipant
7 वर्षांपूर्वीउत्तम, आपले वेगवेगळ्या विषयांवरचे लेख वाचनीय असतात
Anil95
7 वर्षांपूर्वीऊत्तम
ppdigital
7 वर्षांपूर्वीहे सगळे परत वाचायला मिळणे हे भाग्य त ...धन्यवाद
Mrudula
7 वर्षांपूर्वीआपण वेगवेगळ्या विषयांवरचे लेख वेचून काढता आणि वेगवेगळ्या अभिरुचीच्या वाचकांना तृप्त करता ही आम्हांं वाचकांसाठी खूप मोठी गोष्ट आहे.