पाणी कसं अस्तं ? - दिनकर मनवर

पुनश्च    दिनकर मनवर    2018-10-08 19:00:54   

कवी दिनकर मनवर यांची अचानक चर्चेत आलेली हीच ती कविता, ' पाणी कसं अस्तं '. कवीमनाच्या तरल मुग्धावस्थेत सहज स्फुरलेली ही कविता अनेक प्राथमिक प्रश्न विचारते. ज्यांची उत्तरं न देता आल्याने वाचकही स्तब्ध होवून जातो. कविता वाचणाऱ्याला कुठलीही अश्लीलता किंवा एखाद्या समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल अशा पंक्ती किंवा स्त्रियांची मानखंडना होईल असे काव्य, या कवितेतून जाणवत नाही. जाणवते, ती केवळ वेदना आणि टोचतात ते दुखावणारे प्रश्न. मात्र असे हे काव्य वादाच्या भोवऱ्यात सापडावे ही दुर्दैवी घटना आहे. म्हणूनच पुनश्चच्या अवांतर सदरात ही संपूर्ण कविता वाचकांच्या अवलोकनार्थ आज दिली आहे. ********** पाणी कसं अस्तं पाणी हा शब्द मला कसाही उच्चारण्याची मुभा नाहीये. मी ऐकू शकत नाही पाण्याचा आवाज मी चालून जाऊ शकत नाही पाण्याच्या पायरीवरून पाणी कसं अस्तं आकाशासारखं निळंशार किंवा अंगठा छाटल्यावर उडालेल्या रक्ताच्या चिळकांडीसारखं लालसर पाणी कसं अस्तं स्वच्छ पातळ की निर्मळ ? काळं असावं पाणी कदाचित पाथरवटानं फोडलेल्या फाडीसारखं राकट काळं किंवा आदिवासी पोरीच्या स्तनांसारखं जांभळं किंवा पाणी हिरवं नसेल कशावरून ? ( पाणी कसं अस्तं हे मला अजूनही कळू दिलेलं नाहीये ) जे तुंबवून ठेवलेलं अस्तं तळ्यात ते पाणी अस्तं ? पोहऱ्यानं पाणी उपसून घेतलं तर विहिरीतलं पाणी विटतं ? पाणी धारदार वाहतं झुळझुळतं मंजुळ गाणं गातं ते पाणी अस्तं ? गढूळ, सडकं, दूषित, शेवाळलेलं, गटारीतलं, मोरीतलं या पाण्यावरचे निर्बंध अजूनही उठविले गेले नाहीत काय ? पाणी ढगातून बरसतं तेच फक्त पाणी अस्तं ? नि दंगल घडवतं ते पाणी नस्तं? पाणी पावसातून गळतं जमिनीवर बर्फ वितळल्यावर पसर ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कविता रसास्वाद , कविता , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

 1. bhavsarpankaj

    3 वर्षांपूर्वी

  पाणीच पाणी - बा. भ. बोरकर तृप्त पाणी तुष्ट पाणी कोंडलेले रुष्ट पाणी वाकडे नाल्यानद्यांचे वेगवेडे पुष्ट पाणी बावडीचे खोल काळे पारदर्शी मग्न पाणी कोकरुसे नाचणारे खेळणारे नग्न पाणी उंच काळ्या फत्तरींचे पांढरे फेसाळ पाणी सागराच्या मस्तकीचे आंधळे विक्राळ पाणी पावली घोटाळणारे लाडके तांबूस पाणी साळीच्या काट्यांप्रमाणे टोचरे पाऊस पाणी पाणीयाच्या उत्सवी या मातले पाणीच पाणी आणि त्यांच्या प्रत्ययाने मीही पाणी मीही पाणी

 2. shilpa1952

    3 वर्षांपूर्वी

  या कवितेत आक्षेपार्ह काहीही नाही असे मला वाटते आणि TYBA ला अभ्यासासाठी ठेवण्यात यावी असेही काही नाहीय. हल्ली चर्चेत राहण्यासाठी बरेच मार्ग असतात जाहिरात बाजी असेल

 3. प्रकाशहिर्लेकर

    3 वर्षांपूर्वी

  पाणी कस अस्त? सर्वव्यापक पाण्याचे बरेच मुद्दे मांडलेत.तरीही सर्व चुकवून अंगुळ मात्र शिल्लक राहतच. छान.

 4. nagesh kulkarni

    3 वर्षांपूर्वी

  खूपच सुरेख!!

 5. makmind2018

    3 वर्षांपूर्वी

  भावना ... कधी असतात इतक्या संवेदनशील, हळव्या की कवितेच्या एका ओळीने दुखावतात भावना ... कधी असतात इतक्या बथ्थड अन मुर्दाड ओळीने बलात्काराच्या बातम्यांनीही निर्विकार - महेश

 6. maheshkhare

    3 वर्षांपूर्वी

  भावना ... कधी असतात इतक्या संवेदनशील, हळव्या की कवितेच्या एका ओळीने दुखावतात भावना ... कधी असतात इतक्या बथ्थड अन मुर्दाड ओळीने बलात्काराच्या बातम्यांनीही निर्विकार

 7. sunildeshpa

    3 वर्षांपूर्वी

  तेवढी ती वादग्रस्त ओळ सोडा, पण एकूण कविता फार थोर वगैरे वाटली नाही. 'प्रेम कुणावर करावं' (कुसुमाग्रज) आणि 'सलाम' या कवितांचीी छाप जाणवते. बाकी आपल्याकडे बंदी किंवा आक्षेप आल्याखेरीज एखाद्या गोष्टीला महत्व येत नाही हे खरं.

 8. sureshjohari

    3 वर्षांपूर्वी

  खूपच छान. माझ्या मते आक्षेप अस काही नाही . धन्यवाद

 9. Subhash Karmarkar

    3 वर्षांपूर्वी

  सुंदर कविता. एखाद्या खंद्या वाचिक अभिनय करणार्याकडून ऐकायला मिळाली तर बहार येईल.

 10. Ganesh Velankar

    3 वर्षांपूर्वी

  काय आहे या कवितेत आक्षेप घेण्यासारखं ? हा एक ओळ एखाद्याला खटकू शकते ती म्हणजे किंवा आदिवासी पोरीच्या स्तनांसारखं जांभळं बाकी छान कविता मला वाटत समाजातले दोष पाण्याच्या वेगवेगळ्या असणाऱ्या रूपातून दाखवले आहेत

 11. shailesh71

    3 वर्षांपूर्वी

  सुंदर ! आणि धन्यवाद!

 12. Meenal Ogale

    3 वर्षांपूर्वी

  धन्यवाद.कविता खूपच सुरेख आहे.गदारोळाचं बहुतेक राजकीय कारण असावे.

 13. Mrudula

    3 वर्षांपूर्वी

  आक्षेपार्ह असं काय आहे या कवितेत?

 14. विलास यशवंत मोरे

    3 वर्षांपूर्वी

  वाचकांची मागणी ताबडतोब पुर्ण केल्याबद्दल धन्यवाद.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen