तुळशीदास बोरकर- एक आठवण

पुनश्च    प्रमोद बापट    2018-10-04 19:00:52   

मुक्तस्रोत बोरकर गेले. गेले काही दिवस त्यांच्या अस्वस्थतेच्या वार्ता येत होत्या. काळजी वाटत होती. वाढत होती. पण आतून असं वाटत होतं की पुन्हा नेहेमीसारखे बोरकर गुरूजी वावरताना...वाजवताना दिसतील. कारण आपलं अभिजात सौम्यपण घेऊन वावरणाऱ्या बोरकरांना आपली एकट्याचीच तीव्रपणे घेतलेली दखल वा एकट्यावरच पडलेला झगझगीत प्रकाशझोत सोसणारा..मानवणारा नव्हता. आपल्या अवतीभवती असलेल्या दृश्यात ते अतिकोमल स्वरासारखे अतिशय सौम्यपणे वावरत असत. वर्षानुवर्षे संगीत रंगभूमीवर ऑर्गन साथ करताना बसण्याची रंगमंचाच्या थेट समोरची प्रकाशाच्या अगदी निकटची पण केवळ स्वरतालानेच अस्तित्व दर्शविणारी साथसंगतकारांची काळोखी हौदातील जागा हीच बोरकरांनी आनंदाने स्वीकारलेली... भूषविलेली जागा होती. पुढे काही वर्षांनी भारतरत्न पं. भीमसेनजींच्या अभंगवाणीच्या कार्यक्रमात बोरकर मंचस्थ झालेले दिसले. डोक्यावर संघाच्या गणवेषासारखी काळी लोकरीची समोर टोक असलेली टोपी घातलेले बोरकर लोकांना दिसू लागले. अभंगवाणीच्या त्या श्रद्धाजागरणात प्रत्यक्ष भीमसेनजी स्वतःसह केवळ मंचस्थच नव्हे तर सभागृहातील रसिकांनाही 'व्यक्तीत्वाच्या सीमा साऱ्या ओलांडुनी पुढती जाऊ' असा समर्पणाचा अनुभव देत असत. त्या तल्लीन गानपीठाच्या चित्रात बोरकर सहजपणे समाविष्ट होत... वेगळी खूण न दाखवता..ठेवता. तीच त्यांची वृत्ती झाली होती ...ओळखही. पुलं म्हणायचे महाराष्ट्र गोव्याच्या कंठाने गातो. पं. तुळशीदास बोरकरांनी जणू या विधानाचा कृतिविस्तार केला. महाराष्ट्र गोव्याच्या बोटांनीही वाजू-गाऊ लागला. बोरी गावच्या कविश्रेष्ठ बाकीबाब बोरकरांनी जीवन कळलेल्या महानुभावांचे प्रमुख लक्षण सांगताना सहजपणाची महती कवितेतून गायलेली सर्वांनीच ऐकली आहे..अनुभवली ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


संगीत रसास्वाद , व्यक्ती विशेष , मृत्यूलेख , मुक्तस्त्रोत

प्रतिक्रिया

  1. sspalnitkar

      6 वर्षांपूर्वी

    सुंदर लेख !!

  2. manjiriv

      6 वर्षांपूर्वी

    आदरांजली....



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen