२०१८-१९ वर्ष भारतीय संघासाठी विदेश दौऱ्यांनी भरलेलं होतं. त्यातल्या तिसऱ्या आणि शेवटच्या अशा ऑस्ट्रेलिया दौऱ्याची आज गोड सांगता झाली. आधीच्या दोन्ही दौऱ्यामध्ये आपण भेट किंवा दान म्हणून का होईना किमान एक फॉरमॅट हरलो होतो. मागच्या दोन दौऱ्यातलं यश समाधानकारक असलं तरी चुका ही होत्या. काही झालेल्या चुकांमधून बोध भारतीय संघाने नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत होणाऱ्या दौऱ्यात अनेक बदल केले. त्यातल्या मुख्य बदल म्हणजे ओपनर शिखर धवनची गच्छंती आणि कृणाल, पंत, पृथ्वी, मयंक विहारी, विजय शंकर सारख्या युवा खेळाडूंचा समावेश... २१ नोव्हेंबरला सुरू झालेला ह्या दौऱ्याला टि२० ने सुरूवात झाली. भारताची सुरूवात अत्यंत खराब झाली . मैक्सवेल आणि स्टोयनिसची केलेली षटकारांची बरसात आणि नंतर पावसाने १२ व्या खेळाडूच्या रूपाने केलेली खेळी यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला १७ ओवर्समध्ये दहापेक्षा जास्त सरासरीने १७४ धावांचं टारगेट मिळालं होतं. भारताला हे आव्हान नक्कीच कठीण नव्हतं. पण राहुल आणि रोहित शर्मा लवकर गेल्यानंतर धवनने हाणामारीची जवाबदारी घेतली. सासुरवाडीच्या लोकांना किंवा आयेशाच्या मेव्हण्यांना धवनने ७६ धावा कुटल्या होत्या. त्यानंतर टप्प्यावर बॉलिंग करून आणि पंत, कृणाल पांड्या यांच्या चुकीच्या वेळी विकेट गेल्याने भारत हा सामना ४ धावांनी हरला. ऑस्ट्रेलिया टीमने रेन रेन गो अवे गाणं न म्हणता 'ये रे ये रे पावसा' गाणं म्हणले आणि पावसानेही त्यांचं ऐकलं त्यामुळे दुसरा सामना पावसाने वाया गेला. पहिल्या सामन्यात सपाटून मार खालेल्या कृणाल पांड्याने दमदार पुनरागमन करत ३६ धावांत ४ विकेट्स घेतल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला षटकार मारता आला नाही. आपल्या इनिंगमध्ये एकही षटकार न मारता क ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .