अंक- यशवंत, जून १९३१ लेखाबद्दल थोडेस : मराठी भाषा, साहित्य, साहित्यिक वातावरण शंभर वर्षांपूर्वी जसे होते तसे आता राहिलेले नाही असे आपणांस वाटते का? मग हा लेख वाचा आणि चिंतामुक्त व्हा. साहित्य परिषद-आयोजक यांच्यातील वाद, कवी आणि कवितांची थट्टा, मुख्य मंडपाची शोभा, वक्त्यांच्या नाना तऱ्हा, निवडलेल्या अध्यक्षाबद्दलची नाराजी, काही साहित्यिकांनी संमेलनाला न जाण्यातच मानलेला मोठेपणा, संमेलनाला जाताना प्रवासात होणारे हाल हे सगळे १९३१ साली होते तेच २०१९ साली कायम आहे. या सगळ्यातून गेली ८८ वर्षे भाषा, साहित्य टिकले तर ते पुढील शंभऱ वर्षेही सहज टिकेल. फार तर तुम्ही आत्ता हा लेख जसा डिजिटल माध्यमात वाचता आहात तसे त्याचे माध्यम बदलेल. शैली, भाषा, वातावरण टिपण्यातली खुमासदार हुषारी, व्यक्तिरेखाचित्रण, साहित्याच्या वर्तुळातील घडामोडी याचा अतिशय मार्मिक मेळ साधत गोपीनाथ तळवलकर यांनी १९३१ साली हैदराबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनाचा रसाळ, खट्याळ आणि खोड्या काढणारा वृत्तांत या लेखात लिहिलेला आहे. भाषेचा डौल आणि शब्दांचा वापर तर अप्रतिमच. ******** साहित्यसेवकांचे प्रस्थान बुधवार ता. ६ मे ३१ रोजी ३-४ च्या सुमारास हैद्राबादकडे जाणार्या गाडीची मार्गप्रतीक्षा करीत आम्ही उभे होतो. ऊन म्हणजे मी म्हणत होते. चंद्रदर्शनाने चंद्रकांतमणी पाझरतो त्याप्रमाणे आम्ही सूर्यप्रकाशाने पाझरत होतो. गलितकेश, भीष्माचार्याप्रमाणे शोभणारे, मध्यमवयस्क, तरणेबांड आणि शैशवाची सरहद्द ओलांडून तारुण्यात प्रविष्ट झालेले असे लहानथोर अनेक साहित्यसेवक आमच्यात होते, एकदोघी विदुषीही होत्या. इतक्यात एक गृहस्थ दादर उतरून हळूहळू आला. त्याचा पोशाख साहेब ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
यशवंत
, भाषा
, अनुभव कथन
, साहित्य जगत
shashi50
6 वर्षांपूर्वीफारच फर्मास आहे ! वाचताना खूप गम्मत येत होती !! धन्यवाद !!
ajitpatankar
6 वर्षांपूर्वीअप्रतिम नर्मविनोदी लेख.. प्रसन्न वाटले...