बस करा हे समाजसेवेचे ढोंग !

पुनश्च    शरद जोशी    2019-03-22 06:00:46   

अंक – अंतर्नाद, दिवाळी विशेषांक १९९९ शॉक ट्रिटमेंट ही सुद्धा एक उपचार पद्धतीच आहे. शेतकरी आंदोलनात  उभा महाराष्ट्र ढवळून काढणारे नेते शरद जोशी यांची भाषणे आणि मते ही एक प्रकारची शॉक ट्रिटमेंटच होती. सामान्यतः प्रचलित मतांच्या टोकाचे विरोधी विधान करून ते खळबळ उडवून देत. ' स्वार्थाचा त्याग करून दुसऱ्याचे भले करण्यात काही एक मोठेपण आहे' असे त्यांना अजिबात वाटत नाही. समाज ज्यांना  निरलस समाजसेवा म्हणतो ते ढोंग असते कारण समाजसेवा ही सुद्धा अनेकांची गरज असते', असं जोशी म्हणतात. अनेक वर्षे आपण मनात जपलेल्या संकल्पना, समज आणि श्रद्धा यांना धक्का आणि धडका देणारी मते या लेखात शरद जोशी यांनी बेधडक मांडलेली आहेत.  त्यांना 'बेधडक' का म्हणावे लागते, हे हा लेख वाचल्यानंतरच लक्षात येईल. ********** या देशातील जे स्वयंस्फूर्त कार्य गेल्या वीस-पंचवीस वर्षांत मी बघितले त्यावरून माझे अशा कार्याविषयीचे मत प्रतिकूल बनले आहे. कार्यकर्त्यांचा छुपा पण प्रखर अहंकार, त्यांची ढोंगबाजी, त्यांची नाटके, सेवेच्या बुरख्याखाली स्वतःची सोय पाहत राहणे, त्यांच्यातले हेवेदावे, त्यांच्यातील व्यासंगाचा अभाव, मूळ प्रश्न टाळून उगाचच काहीतरी छोटेसे पॅच वर्क स्वरूपाचे काम करीत राहण्याची आत्ममग्न प्रवृत्ती हे सगळे विचारात घेता अशा स्वरूपाच्या कामाची समाजाला काहीही आवश्यकता नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. अंतर्नादच्या दिवाळी अंकासाठी ‘स्वयंस्फूर्त कार्याचे समाजजीवनातील स्थान’ या विषयावर मी लिहावे अशी विनंती भानू काळे यांनी मला तीन-एक महिन्यांपूर्वी केली होती. माझी प्रकृती, निवडणुकीची धामधूम, वेगवेगळे दौर यांमुळे हे लेखन मागे पडत गेले. आता अंक छपाईला द्यायची वेळ आली असल्याकारणाने ह ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद , चिंतन , समाजकारण , दीर्घा

प्रतिक्रिया

  1. Ashishchaskar

      6 वर्षांपूर्वी

    हा लेख मी पहिल्यांदा अंतर्नादमध्ये वाचला तेव्हा आवडला नव्हता. अण्णा हजारे, मेधा पाटकर यांच्यावर नाव न घेता केलेली टिका आवडली नव्हती. लेखाचा एकंदरीतच सूर अतिशय निराशाजनक वाटला होता. आता जवळपास पंधरा वर्षांनी हा लेख पुन्हा वाचताना, यातलं तथ्य जाणवू लागले आहे. पंधरा वर्षात मी ही बदलली आणि देशातली/जगातली परिस्थितीही बदलली. एखाद्या कादंबरीसारखा पुरवून पुरवून वाचावा, असा हा लेख आहे.

  2. sumansons

      6 वर्षांपूर्वी

    आपल्याला जाणवून गेलेल्या विचारांचं शब्दरूप समोर यावं तद्वत जोशींच विवेचन वाचून वाटलं. लेखात उल्लेखलेले 'समाजसेवक' सर्वत्र आढळतात. यांच्या साहित्य कला शाखेने असा धुमाकूळ घातला की, जो आदर्शवादी लिहीत नाही तो लेखकच नव्हेआणि ते लिखाणच नव्हे. नोबेल पुरस्कार प्राप्त विल्यम गोल्डिंग यांच्या 'गाँड्स आँफ फ्लाईज' या कादंबरीला ही नाके मुरडली गेली होती. पुरस्कार देणारी 'पिठं' सुद्धा आदर्शवादी साहित्यालाच पुरस्कार देतात.अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झाल्याबद्दल चर्चा करणे म्हणजे वेळ दवडणे होय. यापेक्षा अपवाद म्हणून जोशी ज्यांचा उल्लेख करतात त्यांचीच चर्चा व्हायला पाहिजे. (चांगल्या अर्थाने) उदाहरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडमध्ये स्थायिक होऊन सुखवस्तू जीवन जगू शकले असते. “राजकारणाच्या चिखलात मलाही पडायचं नव्हतं, पण माझ्या समाजासाठी मला ते कराव लागलं” असे उद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढल्याचे भाऊ पाध्ये यांची साक्ष आहे. कुठल्या प्रेरणेने या महनीय लोकांनी सुखाचा गालीच्या सोडून तरट आणि घोंगडी निवडली असेल? डॉक्टर आंबेडकर, नेहरू, गांधी आदी महनीय लोकांनी साँमरसेट मॉम वाचला नसेल किंवा तसे विचार माहित नसतील हे संभवत नाही. युनो मधली आपली नोकरी सोडून जोशी काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आले. ती उत्तरे मिळाल्यानंतर परत जाऊ शकले असते किंवा थांबू शकले असते. 'करण्यात आनंद मिळतो' हे उत्तर सर्वच आदर्शवादी देऊ शकतात. मानव जातीच्या जीवनातील संस्कृती ही गोष्ट कुठ पासून मोजायची हा वादाचा विषय होईल, तरीही जिथपासून ती सुरू झाली असेल तिथपासून माणसाला सापेक्ष आदर्शाची गरज भासत असावी. अनेक वर्षांच्या या आदर्शाच्या गरजेने माणसाच्या जनुकात बदल (म्युटेशन) घडवून आणला असावा. आणि आदर्शाची आस काही जनुकात बळकट झाली असावी. “आदर्शाची आंतरिक आस नियतीच्या अथक चक्राशी कुठेतरी जिव्हाळ्याने जुळली आहे, आणि त्यातूनच मानवाचा नवा ईश्वर साकारणार आहे”. हे बट्रांड रसेलच कुठेतरी वाचलेलं वाक्य याक्षणी आठवते. 'आदर्शाचं कुत्र धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय' अशी अवस्था आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीने आणि माहिती तंत्रज्ञानाने जवळ आलेल्या जगाच्या घुसळणीनं, प्रबोधनानंतरचे सर्वच तत्त्वज्ञान, विचार आणि इतर मानव्यशाखांचा नव्याने विचार व बांधणी करण्यास भाग पाडले आहे. जनुकशास्त्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता सोबत घेऊनच या आदर्शाच्या 'आसेचा' शोध घ्यावा लागणार आहे. जोशी आज आपल्यात नाहीत हे दुर्दैव ,परंतू वीस वर्षांपूर्वी जोशी एका महत्त्वाच्या विषयाला स्पर्श करून गेलेले आहेत. या विषयाची चर्चा त्यावरील लेखाद्वारे बहुविध च्या मंचावर घडून आल्यास उत्तम होईल. - मनोज महाजन

  3. ajitpatankar

      6 वर्षांपूर्वी

    थेट, भेदक, तर्कशुद्ध, आणि मार्मिक विवेचन... प्रत्येक मुद्द्यावर सविस्तर लिहायचे तर तो एक मोठा लेखच होईल.. कटू सत्य असल्याने पचायला व आचरणात आणायला जडच आहे... तरी देखील एक गोष्ट देखील तेवढीच सत्य आहे, ती म्हणजे एवढं अफाट ज्ञान व तार्किक विचार असलेल्या जोशींच्या संघटनेमध्ये फुट पडली, स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना करून सक्रीय राजकारणात उडी घेण्याचा प्रयत्न फसलाच.. शिवाय शेतकरी चळवळीचा बोजवारा उडाला.. शेतक-यांचे प्रश्न अद्यापही तसेच, तेच आणि होते तिथेच आहेत... अनेक गुंतांतीच्या घटकांचा विचार करता, व्यवस्था बदलणं सोपं नाही..

  4. CDKavathekar

      6 वर्षांपूर्वी

    वस्तूनिषठ विचारसरणी कशी असावी याचे उदाहरण

  5. milindraj09

      6 वर्षांपूर्वी

    ह्याचा प्रतिवाद करणारा लेख कुठे असेल तर तोही वाचायला आवडेल कारण हा लेख फक्त 20 वर्षापूर्वीचा आहे

  6. Aditya Bapat

      6 वर्षांपूर्वी

    'कायमे दुःखतप्तानां' नाही, 'कामये दुःखतप्तानां' हवं



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen