“महाराष्ट्रीय ज्ञानकोश”कार व ‘ब्राह्मण कन्या’दि कादंबऱ्यांचे कर्ते, डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर, यांची या वर्षी महाराष्ट्रीय साहित्य-संमेलनाच्या अध्यक्षपदावर योजना झाली असल्यामुळे त्यांचे चरित्र व कार्य याबद्दल अनेक वाङ्मयप्रेमी रसिकांच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली असण्याचा संभव आहे. मराठी भाषेच्या अभिवृद्ध्यर्थ आजपर्यंत ज्यांनी काही महत्त्वाची कामगिरी केली आहे. त्यामध्ये डॉ. केतकर यांचे वास्तविक स्थान फारच उच्च आहे. डॉ. केतकर यांची वाङ्मयनिर्मिती विविध प्रकारची असून त्यांच्या लिखाणात नाविन्य व स्वतंत्र विचार ओतप्रोत भरलेले असतात. त्यांची साहित्य-सेवा वाङ्मयनिर्मितीपुरतीच मर्यादित नसून, लेखनव्यवसाय व धंदेशास्त्र यांची सांगड त्यांनी आपल्या आयुष्यक्रमात घालून दाखविली आहे. यामुळे त्यांचे चरित्र जितके उद्बोधक तितकेच उपयुक्तही होण्यासारखे आहे. अंक- यशवंत, एप्रिल-मे १९३१ असामान्य मनुष्याच्या कृतीचे खरे मर्म कळून घेण्याची पात्रता सर्वांच्या ठिकाणी असतेच असे नाही; पण आपणांपैकी एक मनुष्य या नात्याने त्याची चालचलणूक कशी आहे, त्याचा स्वभाव कोणत्या तऱ्हेचा आहे, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, हे जाणण्याची उत्सुकता मात्र सर्वांनाच असते. यामुळे सामान्य लोकांना अलौकिक पुरुषांच्या कृतीइतकेच त्यांचे खाजगी जीवनही कौतुकास्पद वाटते. प्रस्तुत अल्प चरित्राचा उद्देश डॉ. केतकर यांच्याबद्दल अशा प्रकारची काही थोडी माहिती देऊन त्यांच्या कृतींचे निरीक्षण करणे हा आहे; परंतु लेखाची मर्यादा अत्यंत नियमित असल्यामुळे हा उद्देश कितपत सिद्धीस जाईल याबद्दल शंका वाटते. कृतकार्याच्या महत्त्वाच्या मानाने पहाता डॉ. केतकर यांची साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षपदावर यापूर्वीच योजना व्हाव ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
यशवंत
, भाषा
, व्यक्ती विशेष
, साहित्य जगत
किरण भिडे
5 वर्षांपूर्वीनक्कीच करूया...दाखल घेतली आहे.
[email protected]
5 वर्षांपूर्वीडॉ. केतकरांचे अजुन काही लिखाण वाचायला आवडेल. बहुविध च्या संआदक मंडळाला विनंती आहे की त्यांचे एक पांडित्यप्रचुर लेख ( छोटा चवी पुरता ) आणि कादंबरीतील काही अंश किंवा ललित लेख प्रसिद्ध करावा. त्यांचे व्यक्तिमत्व वेगळे आणि चमत्कृतीपूर्ण आहे.