मत कोणाला देणार? पक्षाचा उमेदवार, की स्वतंत्र उमेदवार?

भारतातील पहिली सार्वत्रिक निवडणूक १९५१ साली झाली  परंतु देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच स्थानिकांकडे प्रशासन सोपवण्यााची प्रक्रिया सुरू झाली होती.  १९३७ साली ११ प्रांतांमध्ये  प्रांतिक निवडणुका  झाल्या आणि सात प्रांतात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. म्हणजे १९५१ साली आपली राजकीय संस्कृती चांगली पंधरा वर्षे जुनी झाली होती. त्या पंधरा वर्षात राजकीय नेत्यांची प्रतिमा  काय तयार झाली होती? काँग्रेसचेच तेव्हाचे म्हणजे १९५१ मधले माजी आमदार डॉ देशमुख प्रस्तुत लेखात म्हणतात,’पक्षांतील उमेदवाराला  मोठा फायदा म्हणजे बुद्धी नसली तरी  चालते हा होय; किंबहुना बुद्धी असणे हा मोठा तोटाच आहे. यामुळे बुद्धीमान माणसे पक्षांत जायचा संभव कमी व पक्षालाही बुद्धीवान् उमेदवाराला पक्षांत घेण्याची उत्कंठा नसते! उमेदवारांची चढाओढ, तो किती वेळां तुरुंगांत गेला, त्याच्यावरच बसलेली आहे! जितक्या जास्त वेळा तो तुरुंगांत गेला असेल, तेवढा उमेदवारांच्या निवडणुकींत त्याचा नंबर वर व निवडणुकीचा हक्क जास्त, अशी परिस्थिती पक्षांत झाली आहे.’ राजकीय पक्षांऐवजी स्वतंत्र उमेदवारांना मत द्यावे असे आवाहन करताना लेखकाने या लेखात जे काही लिहिले आहे ते  वाचताना आपण २०१९ सालात लिहिलेला लेख वाचतो आहोत की काय असेच वाटत राहते..

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 2 Comments

  1. लेख अगदी ताजा टवटवीत आहे. जणू सद्य परिस्थितीला उद्देशून लिहीला आहे.१९५१ ते २०१९ परिस्थिती जैसे थे.

  2. Perfect! The things continue as if history repeats!!!!

Leave a Reply

Close Menu