चळवळी ग्रेटा

वयम्    श्रीराम शिधये    2019-04-18 10:01:52   

शाळकरी वयातल्या ग्रेटानं जगातल्या अनेकांचं लक्ष वेधून घेतलं असं काय बरं केलं या ग्रेटाने..?

दि. ३ जानेवारी २००३ या दिवशी जन्माला आलेली स्वीडनची ग्रेटा थुनबर्ग ही आता १६ वर्षांची आहे. शाळकरी वयातल्या ग्रेटानं जगातल्या अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशेषतः जे पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये काम करतात, हवामानात होत असलेल्या बदलांबद्दल जे सजग आहेत आणि तापत जाणारी हवा, सागराच्या सरासरी पातळीत होणारी वाढ, दक्षिण-उत्तर ध्रुव प्रदेशांतल्या घडामोडी, अनेक बेटांची नामोनिशाणी पुसून जाण्याची भीती अशा गोष्टींनी जे अस्वस्थ आहेत,  अशा लोकांना ग्रेटा थुनबर्ग हे नाव चांगलंच माहीत आहे. याचं कारण गेल्या वर्षी ग्रेटानं स्वीडनच्या संसदेच्या इमारतीच्या बाहेर 'संप' केला. म्हणजे आपल्या शाळेमध्ये न जाता ती संसदेच्या इमारतीच्या बाहेर बसून राहिली. त्यावेळी तिनं आपल्या मनातले विचार लिहून काढले होते आणि ते तिच्याच परवानगीनं प्रसिद्धही करण्यात आले होते. त्यात तिनं बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या. उदाहरणार्थ, 'खरंतर हवामानातील बदलाचा हा प्रश्न, हा येणारा काळ कसा असणार आहे, हे नक्की करणारा आहे. काळाला कलाटणी देण्याची शक्ती असणारी ही समस्या आहे. असं असूनसुद्धा जवळपास प्रत्येकाला असं वाटतंय की, आपण यातून काहीतरी मार्ग काढू शकू.  त्यामुळेच 'सकारात्मक रीतीनं विचार करा' असंच प्रत्येकजण म्हणत आहे. त्यांचं हे सांगणं मला पटत नाही. याचं कारण आपल्याला अगदी नक्की माहीत आहे,  की तो राक्षसी हिमनग तिथं आहे. त्याला धडक दिल्यानंतर काय होणार आहे, तेसुद्धा आपल्याला समजलेलं आहे. आणि तरीसुद्धा आपण आपलं जहाज घेऊन त्या हिमनगाच्याच दिशेनं झपाट्यानं प्रवास करत आहोत. त्या हिमनगाच्या दिशेनं जाण्याचा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


पर्यावरण , व्यक्ती विशेष

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen