अंटार्क्टिका म्हणजे जणू बर्फाचे वाळवंटच! बहुतांश भागात झाडाझुडपांचा अभावच. या उजाड, ओसाड खंडावर प्राणवायू ठासून भरला आहे. याचे कारण म्हणजे पृथ्वीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या दिशा! भारतीय संशोधन मोहिमेतील डॉक्टर म्हणून या खंडावर जाऊन, वर्षभर राहून आलेल्या डॉ. मधुबाला चिंचाळकर यांनी आपल्यासाठी लिहिलेली ही लेखमाला. [caption id="attachment_10007" align="alignright" width="300"] penguin[/caption] अंटार्क्टिका हा आकारमानाने पाचवा क्रमांक असणारा खंड आहे. अति शीत, शुष्क वातावरण आणि तीव्र वेगाने वाहणारे वारे! अशा या खंडाचा ९८% भूभाग बर्फाच्छादित आहे.. थोडाथोडका नाही तर सुमारे ४ हजार मीटर उंचीचा बर्फाचा थर... परंतु निसर्गाची किमया तरी पाहा! अशा खडतर आणि प्रतिकूल खंडावर वसंतऋतूचे आगमन होताच प्राणी व वनस्पती जीवन बहरते. डिसेंबर ते फेब्रुवारी ह्या उन्हाळ्याच्या महिन्यात येथे जणू निसर्गदेवतेची जादूची कांडी फिरते! येथील प्राणीजीवन व वनस्पती जीवन अद्वितीय आहे. येथे आहे ती आपल्या पृथ्वीवरील अतिशय नाजूक आणि निसर्गत:च आढळून येणारी जैविक साखळी... ती देखील बहुधा शेवटचीच! सुमारे अडीच ते तीन कोटी वर्षांपासून इतर खंडांपासून अलग झालेल्या आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मानवी हस्तक्षेपापासून दूर राहिलेल्या या भूमीवर अतुलनीय जीवसृष्टी आहे! ह्या खडतर खंडावर हिवाळ्यात पांढऱ्या शुभ्र बर्फाच्या आवरणात एकही वनस्पती दृष्टीस पडत नाही, परंतु उन्हाळ्याची चाहूल लागताच शेवाळे ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
ज्ञानरंजन
, अनुभव कथन
, पर्यावरण
, स्थल विशेष