हळद्या पक्षी माहितीये तुम्हांला? या सोनपिवळ्या पक्ष्याची एक दंतकथा आहे. दंतकथा म्हणजे कुणीतरी कल्पनेने रंगवलेली कथा. या दंतकथा कुणीतरी रचतं आणि मग ती सांगवोसांगवी इतरांपर्यंत पोचते. पूर्वी अशा अनेक दंतकथा लोकांना माहीत असायच्या. स्मार्टफोन मेसेज, अॅप काहीही नव्हतं तरी या कथा शेकडो, हजारो, लाखो लोकांपर्यंत पोचायच्या.. कारण एकमेकांशी गप्पागोष्टी करताना त्या सांगितल्या जायच्या. वाचा ही हळद्या पक्ष्याची एक दंतकथा आणि त्याचबरोबर शास्त्रीय माहितीसुद्धा- खूप जुनी गोष्ट. बंगाल प्रांतात एक तरुण व्यापारी राहायचा. तो एकदम सरळ साधा आणि शांत स्वभावाचा होता, परंतु त्याची आई मात्र अत्यंत दुष्ट स्वभावाची होती. व्यापारी तिला घाबरून असायचा. तिच्या स्वभावामुळे तिच्याशी कुणी फारसं बोलत नसे. तरुण व्यापाऱ्याचे लग्न झाले. नवीन नवरी घरी आली. परंतु व्यापाऱ्याच्या आईने मात्र तिचा छळ चालवला होता. तिला ती सतत टाकून बोले. रागवे. तिच्या चुका काढत राही. व्यापाऱ्याची बायको स्वभावाने शांत असल्याने आणि व्यापा-याचे आईपुढे काहीच चालू न शकल्याने दोघेही शांत राहत आणि आज ना उद्या परिस्थिती बदलेल, असा एकमेकांना दिलासा देत ते दिवस ढकलत होते. थंडीचे दिवस होते आणि पौष पारबोहची तयारी सुरू झाली. मकरसंक्रांतीच्या काळात हा सण साजरा करतात. या सणासाठी ‘पीठा’ हा गोड पदार्थ बनवतात. व्यापाऱ्याची बायको स्वैपाकघरात होती. तंदूर पेटलेला होता. काम करताना तिची साडी हळदीने माखली होती. तिला खूप भूक लागलेली होती, पण सासूच्या भीतीने तिने काहीच खाल्ले नव्हते. सासू नाही असा अंदाज घेत तिने ‘पीठा’ खायला सुरवात केली. खाण्याच्या नादात तिला सासू आल्याचे समजलेच नाही. सासू आल्याचे पाहताच तिने घाबरून जाऊन ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .