हवाई हल्ल्यातील विमाने 

वयम्    समीर कर्वे    2019-04-22 11:00:58   

२६-२७ फेब्रुवारी २०१९ला भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी प्रशिक्षणाच्या छावण्या नेमकेपणाने उद्ध्वस्त केल्या. हे लक्ष्य टिपण्यासाठी भारतीय हवाईदलातील मिराज २००० या लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला. एकंदरीत या कारवाईत वापरल्या गेलेल्या भारतीय हवाईदलाच्या विमानांची वैशिष्ट्ये काय होती, त्याची माहिती-

दोस्तांनो, आपला शूर वायूवीर विंगकमांडर अभिनंदन वर्तमान हा पाकिस्तानच्या तावडीत सापडूनही कसा निडरपणे भारतात परतला, ते तुम्ही पाहिलंच. विंगकमांडर अभिनंदनच्या रुबाबदार मिशा हे तर भारतीय हवाईदलातील जाँबाज वैमानिकांचं वर्णन करणारे चिन्हच ठरू लागले. गेला महिनाभर चर्चा होती, भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या हवाईहल्ल्यांची. भारताने पाकिस्तानातील दहशतवादी प्रशिक्षणाच्या छावण्या नेमकेपणाने उद्ध्वस्त केल्या. हे लक्ष्य टिपण्यासाठी भारतीय हवाईदलातील मिराज २००० या लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला. परंतु अवघ्या २१ मिनिटांत या धडाकेबाज कारवाईचा निकालही लावायचा आणि पाकिस्तानच्या रडारना किंवा विमानांना चकवाही द्यायचा, ही कामगिरी मिराज २००० विमाने करू शकली, कारण त्यांना आपल्या भारतीय हवाईदलाच्या इतर विमानांचीही साथ होती. फायरिंग किंवा बंदुकीने चकमकी सुरू असतील, तर एकेक सैनिक जसे आपल्या सहकाऱ्याला (बडी सोल्जर) कव्हर देतो, तसेच कव्हर आपल्या ताफ्यातील इतर विमानांनीही दिले होते. तुमच्यापैकी कित्येकांचा जन्मही झाला नसेल, तेव्हा कारगीलचे युद्ध काश्मीरमध्ये झाले होते. १९९९ मध्ये. त्यावेळीही युद्धाचा निकाल लावण्यासाठी भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सफेद सागर’ हाती घेतले आणि मिराज विमानेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर धाडली होती. अर्थात त् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen