अनुभवांची पॉवरबँक

सुट्टी म्हणजे ढेर सारे अनुभव! आवडीच्या कला शिकणे, भरपूर वाचणे, छंदांत रमणे, कुटुंबीयांबरोबर गप्पा-भटकंती, नातेवाईकांकडे जाणे-राहणे, मित्रमैत्रिणींबरोबर हुंदडताना त्यांच्याबरोबर होणारे शेअरिंग… किती वेगवेगळे अनुभव असतात हे!  सुट्टीच्या काळात आपण स्वत:हून घेतलेले जे जे खूप आनंददायी अनुभव असतात ना, ते आपोआप जाऊन बसतात आपल्या मेंदूच्या पॉवरबँकमध्ये! मग त्यात ठासून भरलेल्या कल्पना, क्लुप्त्या बरोबर कामी येतात वर्षभर! अगदी आयुष्यभरदेखील!! उन्हाळ्यात अनेक महिला वाळवणं करतात, माहितीये नं तुम्हाला? प्रखर सूर्याच्या तेजाचा वापर करून पापड, फेण्या, सांडगे, शेवया असे अनेक पदार्थ केले जातात. मसाले, लोणची, मुरांबे करून ठेवले जातात. वर्षभराच्या चटकदार खाण्याची सोय असते ती! हे पदार्थ आपल्या जेवणाला लज्जतदार करतात. याला म्हणतात, वर्षभराची ‘बेगमी’! तशीच आपली पॉवरबँक!!

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'वयम्' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'वयम्' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Close Menu