निर्भीड महावीरसिंग

वयम्    प्रकाश कामत    2019-08-15 10:00:37   

ही गोष्ट आहे एका सच्च्या देशभक्ताची आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या एका निर्भीड क्रांतिकारकाची... त्याचं नाव होतं महावीरसिंग! ९ ऑगस्ट क्रांतिदिन आणि १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन. या दिवशी तरी आपण आपल्या क्रांतिकारकांना आणि स्वातंत्र्यलढ्यातील प्रत्येक भारतीयाला मनोमन नमस्कार करून त्यांची आठवण जागवूया. त्यांच्यामुळे मिळालेल्या स्वातंत्र्याचा आपण जबाबदार नागरिक बनून आदर करूया.   

उत्तर प्रदेशमधील एका जिल्ह्यातील कासगंजच्या शाळेत महावीरसिंग शिकत होते, तेव्हाची घटना आहे. महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंगाचं आंदोलन देशभर पसरत चाललं होतं. देशप्रेमी जनता त्यात मोठ्या संख्येने सहभागी होत होती. गावागावांतील सरकारी अधिकारी, श्रीमंत आणि अमीर-उमराव मंडळी मात्र आंदोलनापासून दूर राहात होती. ब्रिटिश सरकारशी आपण कसे आणि किती प्रामाणिक आहोत आणि काँग्रेसचं आंदोलन किती चुकीचं आहे हे सांगून आपली राजनिष्ठा दाखवावी, म्हणून कासगंजच्या रायबहादूर खानबहादूर आणि सरकारी अधिका-यांनी एकदा सभेचं आयोजन केलं होतं. गावातल्या लोकांबरोबर त्यांनी शाळेतील मुलांनाही गोळा केलं होतं. सभा सुरू झाली. एकेक वक्ता व्यासपीठावर येऊन ब्रिटिशांचे गोडवे गात क्रांतिकारकांना आणि काँग्रेसला दूषणं देऊ लागला. विद्यार्थ्यांमध्ये बसलेल्या एका मुलाला ते सहन झालं नाही. भर सभेत तो जोरात ओरडला, ‘महात्मा गांधी की...’ आणि इतर मुलांनी ‘जय’ म्हणत घोषणा पूर्ण केली. त्यांनतर सभेत गांधीजींचा जयजयकारच ऐकू येऊ लागला. घोषणा देत मुलं-माणसं उठली आणि सभा उधळली गेली. चिडलेल्या आयोजकांनी घोषणा देणा-या महावीरसिंगांना हुडकून का ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen