अम्मी, अब्बूंनी तुला आनंद व्हावा म्हणून हा रेडिओ दिला तसं आम्हांला बरं वाटावं म्हणून त्यांचा वेळ दिला असता तर... छोटीशी हृद्य कथा-
सकाळचे सात वाजले होते. जमादारांच्या घरात नेहमीप्रमाणे रेडिओची पिरपीर चालली होती. शन्नूबेन चपात्या लाटत होती. सारा आणि दानिया शाळेला जायची तयारी करत होत्या. चपात्या भाजता भाजताच शन्नू एका हाताने रेडिओचं बटण फिरवत होती. तिला हवं ते स्टेशन सापडतच नव्हतं! "रेहने दे ना अम्मी कायको सुबह सुबह उस रेडिओ की कटकट!" दानिया वैतागून म्हणाली. "ओय चुप! किती छान छान गाणी लागतात सकाळी. और इस रेडिओको तू कुछ मत कह... तुझ्या अब्बांनी खास माझ्या वाढदिवसाला दिलाय बघ तो. मला गाणी ऐकायची भारी आवड, म्हणून खास कोल्हापूरवरून आणलाय त्यांनी." "काश.. अब्बूंनी तुला हा रेडिओ दिला तसा आम्हांला बरं वाटावं म्हणून त्यांचा वेळ दिला असता.." असं चिमुकली सारा म्हणताच शन्नू एकदम गप्पच झाली. दोन सेकंदांची शांतता गेली आणि रेडिओवर एक गाणं वाजलं, 'छोटीसी गुडिया, नन्हीसी चिडिया...', ‘ए दिदी, हेच ना ते गाणं अब्बू आपल्यासाठी म्हणायचे ते?’ असं साराने विचारल्यावर दानिया फक्त हसली. तिच्या डोळ्यांत त्या साऱ्या आठवणी जाग्या झाल्या होत्या, झोपाळ्यावर बसलेले अब्बू आणि त्यांच्या दोन्ही मांड्यांवर डोकं ठेवून गोष्ट ऐकण्यासाठी लवंडलेल्या सारा आणि दानिया... सगळं सगळं तिला आठवत होतं, पण ती काहीच बोलली नाही. थोड्या वेळाने त्या शाळेत गेल्या. शन्नूला फार वाईट वाटलं, पण तीही काही बोलू शकली नाही. तिच्या मुली खरं तेच तर सांगत होत्या. तिनं लगेच मुज्जफरला फोन केला, "जी सुनिये ना, आज जरा घर जल्दी आईयेगा. वह क्या है ना की, बच्चे थोडे नाराज है आपसे!" " ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
purnanand
6 वर्षांपूर्वीछोट्याशा कथेतून छान सन्देश .आजच्या आईटी मध्ये काम करण्याऱ्या आई बाबांची हीच अवस्था काहीशी झाली आहे.