पांढरेशुभ्र वाळवंट


‘मैत्री’ केंद्र जवळ आल्याची खूण म्हणजे पांढऱ्या बर्फात उभा असलेला, लहानशा टेकडीएवढा भलामोठा काळाभोर कातळ! भारतीयांनी त्याचे नाव किती सुंदर ठेवले आहे- ‘शिवलिंग’!

[caption id="attachment_13707" align="alignright" width="300"] शिवलिंग[/caption] निसर्गसुंदर गोव्यातील सागरकिनारी वसलेल्या NCPOR (National Centre For Polar and Ocean Research) या संस्थेतील आमचे प्रशिक्षण पूर्ण झाले. मी आणि माझ्यासमवेत अंटार्क्टिकातील भारतीय संशोधन केंद्रात निघालेले माझे आठ सहकारी सदस्य या अद्भुत मोहिमेत सहभागी होण्यासाठी सज्ज झालो. संमिश्र भावना मनात दाटून आल्या होत्या.  खूप उत्सुकता, अभिमान आणि वर्षभर प्रियजन भेटणार नाहीत म्हणून वाटणारी हुरहूर! ८ जानेवारी २०१७ रोजी आम्ही केपटाऊनसाठी प्रयाण केले. केपटाऊन विमानतळावर आमचे स्वागत झाले. हे दक्षिण आफ्रिकेतील एक सुंदर शहर आहे. केपटाऊनच्या नुसत्या दर्शनानेच प्रवासाचा थकवा पार पळून गेला. दुसऱ्या दिवशी आम्ही केपटाऊनमधील भारतीय वकिलातीला भेट दिली, तसेच काही प्रेक्षणीय स्थळे बघितली.  फक्त उन्हाळ्याच्या मोसमात अंटार्क्टिकातील हवाई तळावर ये-जा करता येते. ही व्यवस्था करणाऱ्या ‘अंटार्क्टिक लाँजिस्टिक सेंटर इंटरनँशनल’ (ALCI) या  विमान कंपनीचे ऑफिस केपटाऊनमध्ये आहे. तेथे आम्हांला अंटार्क्टिकाला जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या विमानप्रवासाची इत्थंभूत माहिती दिली गेली. या विमानात बसताना, आपल्या जवळ फक्त एक लहान ह ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ज्ञानरंजन , अनुभव कथन , स्थल विशेष

प्रतिक्रिया

  1. pradnyakulkarni

      5 वर्षांपूर्वी

    खूप सुंदर !??

  2. vilasrose

      6 वर्षांपूर्वी

    चांगला लेख.नेहमीपेक्षा वेगळ्या प्रदेशाबाबत माहीती मिळाली.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen