स्केअरी स्टोरीज टु टेल इन द डार्क

वयम्    गणेश मतकरी    2019-09-16 11:00:50   

आपल्याकडे भय/भूतपटांना, आणि खरं म्हणजे बरेच प्रमाणात कथांनाही, मोठ्यांच्या चित्रपटांचं, साहित्याचं लेबल लावून ठेवलेलं दिसतं. खरं तर त्याची काही गरज नाही. तात्पुरती भीती ही नक्कीच आपलं मनोरंजन करू शकते आणि आपल्या विचारांना, कल्पनांना नवी दिशाही देऊ शकते. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे 'स्केअरी स्टोरीज टु टेल इन द डार्क.' वाचा या चित्रपटाचा आस्वाद- पुस्तकाचा सिनेमा  कसा होतो, या प्रश्नाचं उत्तर वाटतं तितकं सोपं नाही, आणि अनेक लेखक दिग्दर्शक हे रूपांतर वेगवेगळ्या पद्धतीने साधताना दिसतात. म्हणजे काही वेळा पुस्तकाचं कथानक जसं आहे तसं, आणि संपूर्णपणे आपल्याला चित्रपटात आणलेलं दिसतं. काही वेळा त्यातल्या थोड्याच भागाला महत्त्व देत बाकीचा गाळला जातो, तर कधीकधी त्यात थोडेफार बदलही केले जातात. प्रसंग वाढवणं, घटनांचा क्रम बदलणं, नवी पात्र आणणं, किंवा मूळ कथेतली कमी करणं, असे हे वेगवेगळ्या प्रकारचे बदल असतात. पण जेव्हा पुस्तकांची मांडणी सिनेमात रूपांतर करण्यासाठी सोयीची नसते, तेव्हा काढलेले मार्ग हे अधिकच गुंगवणारे असतात. तुम्ही कदाचित आपल्याकडे नुकत्याच लागून गेलेल्या ‘स्केअरी स्टोरीज टु टेल इन द डार्क’ या सिनेमाबद्दल ऐकलं असेल. त्याच्या रूपांतराविषयी हे म्हणता येईल. ॲल्विन श्वार्त्झ या लेखकाने लिहिलेलं हे एक मजेदार पुस्तक आहे, ज्याला ब्रेट हेलक्विस्ट या चित्रकाराने अचूक वातावरणनिर्मिती करणारी चित्रं काढलेली आहेत. ही तीन भागांची मालिका आहे. आता ‘अंधारात घाबरवण्यासाठी सांगायच्या गोष्टींचं’ पुस्तक मजेदार का, तर ते ज्या प्रकारे लिहिलंय, त्यात याचं कारण सापडेल. या कथा तशा स्वतंत्र नाहीत, दंतकथांसारख्या आहेत. लेखकाने कुठेकुठे ऐकल्या – वाचल्या, ल ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रिया

  1. akashvthele

      5 वर्षांपूर्वी

    बॉलीवुड मध्ये आलेल्या 'डरना माना है' याबद्दल आपल काय मत आहे?



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen