येत्या गुरुवारी, 26 डिसेंबर रोजी सकाळी सूर्यग्रहण होणार आहे. तुम्ही ते पाहणार असालच. ग्रहणाचा गॉगल लावायला विसरू नका हं! तुम्ही ग्रहण कुठून पाहिले, ते पाहताना काय अनुभवले, याची निरीक्षणे आम्हाला नक्की लिहून पाठवा. निवडक निरीक्षण-लेखांना 'वयम्' मासिकात प्रसिद्धी मिळेल. इयत्ता पहिली ते दहावीचे विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. ग्रहणकाळातील निरीक्षणे अत्यंत मोलाची असतात. त्यावरून वैज्ञानिक मंडळी अनेक निष्कर्ष काढत असतात. बघा, तुमचेही निरीक्षण महत्त्वाचे ठरू शकते. तुम्ही लिहिलेली निरीक्षणे आम्ही विज्ञान-तज्ज्ञांकडे पाठवू! तुमचे निरीक्षण-लेख जास्तीत जास्त ३०० शब्दांत लिहून पाठवा. डेडलाईन- १ जानेवारीपर्यंत तुमचे लेखन आमच्याकडे पोहोचले पाहिजे. लेखासोबत तुमचे नाव, इयत्ता, शाळेचे नाव, वयवर्षे, पत्ता, संपर्क क्रमांक, इमेल आय.डी. हेही जरूर लिहा. निरीक्षण-लेख पाठवण्याचा पत्ता - ‘वयम्’ न्यू वंदना को.ऑ.हौ. सोसायटी, ३ रा मजला, लाल बहादूर शास्त्री मार्ग, वंदना सिनेमाजवळ, ठाणे ४००६०२. किंवा तुम्ही तुमचे निरीक्षण-लेख ई-मेल द्वारेही पाठवू शकतात - [email protected] या ई-मेल आय.डी. वर. ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
शुभदा चौकर
5 वर्षांपूर्वीPlease check our website www.wayam.in
़अरुण दत्तात्रय पळणीटकर
5 वर्षांपूर्वीI Want to know about the periodical Wayam.