कंकणाकृती सूर्यग्रहण नक्की पहा!

वयम्    हेमंत मोने    2019-12-25 03:02:58   

गुरुवार, 26 डिसेंबरला सकाळी कंकणाकृती सूर्यग्रहण (Annular Solar Eclipse) होणार आहे. नक्की पाहा ते. आधी त्याविषयी समजून घेऊया-

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आपल्याला सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. या वर्षी आधी दोन सूर्यग्रहणे होऊन गेली, परंतु ती भारतातून दिसणार नव्हती. आता गुरुवार, 26 डिसेंबरला सकाळी कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू राज्याच्या काही भागांतून हे ग्रहण कंकणाकृती स्वरूपात दिसणार आहे. भारताच्या उरलेल्या भागात हे ग्रहण खंडग्रास स्वरूपात दिसणार आहे. मुंबई परिसरात सूर्यबिंबाचा जास्तीत जास्त 79  टक्के भाग झाकला गेलेला पाहता येईल. सूर्यग्रहण नुसत्या  डोळ्यांनी किंवा आपण नेहमी वापरतो, त्या गॉगलने अजिबात पाहू नका. ग्रहण  पाहण्यासाठी सौर चष्म्याचा वापर करा. तो चष्मा निरीक्षणास सुरक्षित आहे ना, याची खात्री करून घ्या. सूर्यग्रहण- एक पर्वणी आपण पृथ्वीवासीय सूर्यग्रहणाच्या दृष्टीने सुदैवी आहोत. सूर्यबिंब आणि चंद्रबिंब यांचे आकार जवळ जवळ सारखे आहेत.  सूर्यबिंब किंवा चंद्रबिंब आपल्या डोळ्यांशी सुमारे अर्ध्या अंशाचा कोन  करते, त्यामुळे चंद्रबिंब सूर्यबिंबाला झाकू शकते. सूर्य आणि चंद्र यांचे पृथ्वीपासूनचे अंतर काही मर्यादेत बदलत असते; साहजिकच त्यांच्या बिंबाचे आकार थोडे कमी जास्त होतात. जर चंद्रबिंब सूर्यबिंबाएवढे किंवा त्यापेक्षा थोडे मोठे असेल तर ‘खग्रास सूर्यग्रहण’ (Total Solar Eclipse) होते.  याउलट, चंद्रबिंब सूर्यबिंबापेक्षा थोडे लहान असेल तर सूर्य आणि निरीक्षक यांच्या मध्ये येणारे चंद्रबिंब सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशा वेळी सूर्याची परिघ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण , ज्ञानरंजन , बालसाहित्य

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen