शहाण्या समाजाचे स्वप्न

वयम्    शुभदा चौकर    2020-01-01 10:00:27   

समाजाचं सध्याचं चित्र पाहिल्यावर लिहलेलं हे संपादकीय-

वयम् दोस्तांनो, सन २०२०च्या पहिल्या अंकाचे संपादकीय लिहिताना आसपास सर्वत्र किती गोंधळाचे वातावरण आहे, याचे वाईट वाटतेय. ‘सुधारित नागरिकत्व’ कायद्याचे विरोधक मोर्चे काढत आहेत, त्या मोर्चांना अनेक ठिकाणी हिंसक वळण मिळते आहे... मुलींवरील बळजबरीच्या, अत्याचारांच्या घटना वारंवार प्रसिद्ध होत आहेत... विधानसभेच्या सभागृहातही आमदारांची धक्काबुक्की... एकंदरच नकारात्मक बातम्यांनी वृत्तपत्रे व न्यूज-बुलेटीन भरलेली आहेत. तुम्हा मुलांना असे आक्रमक सामाजिक वातावरण पाहावे लागतेय, त्याबद्दल खूप अपराधभाव मनात दाटून आलाय. परवा एका विद्यापीठाच्या रस्त्यावरून आपापली बॅग घेऊन परत येणाऱ्या मुलींचे छायाचित्र बघून मन हेलावले. कुणाच्या तरी आक्रस्ताळेपणामुळे कितीजणांचे उगाचच नुकसान होते, हे कसे कळत नाही या आक्रमक लोकांना? तुम्हा मुलांना फार अविचारी, अशांत, हिंसक अशा समाजाचे दर्शन घडतेय. अशावेळी फार हतबल वाटते. You definitely deserve better society  than this!  खरेतर सन २०२०चे मोठे स्वप्न आपल्याला माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी दाखवले होते. २०२० पर्यंत भारत देश बौद्धिक महासत्ता व्हावा आणि विकसित राष्ट्रांत त्याची गणना व्हावी, यासाठी कृतियोजना तयार केली होती  त्यांनी. राष्ट्रपती म्हणून डॉ. अब्दुल कलाम लाखो मुलांना, तरुणांना भेटले. त्यांच्या मनातील स्वप्न त्यांनी या तरुण समाजात पेरण्याचा प्रयत्न केला. जिथे जिथे जात तिथे ते एखादी प्रतिज्ञा म्हणून घेत. हे ध्येय गाठण्यासाठी काय काय करावे, त्याचे मार्गदर्शन करीत; मुख्य म्हणजे हे ध्येय गाठण्यासाठी आशा पल्लवित करीत. निराशेला दूर सारण्यासा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


वयम् - संपादकीय

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen