‘बहुरंगी बहर’ म्हणजे आम्हां सर्व मुलांसाठीचा एक जिव्हाळ्याचा उपक्रम. २०१६ मध्ये झालेल्या ‘बहुरंगी बहर’मध्ये माझी निवड झाली. तेव्हापासून आम्हांला ‘बहुरंगी बहर’ म्हटले, की उत्साह संचारतो. यावर्षी मागच्या तीन वर्षांत ‘बहुरंगी बहर’ प्रकल्पात निवड झालेले आम्ही सगळेजण स्वयंसेवक म्हणून मदतीला आलो होतो. आम्हांला दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडताना आम्हीही अनेक गोष्टी शिकत होतो. ‘बहुरंगी बहर २०१९’चा हा वृत्तान्त-
‘बहुरंगी बहर’च्या चौथ्या पर्वातील पहिल्या फेरीत जवळपास ५०० मुलांनी ‘बहुरंगी बहर’ची प्रश्नावली भरून पाठवली होती. ह्या पहिल्या फेरीच्या उत्तरपत्रिकांचे परीक्षण केले, लेखक आणि मानसोपचारतज्ज्ञ ह्यांच्या गटाने - शुभदा चौकर, अलकनंदा पाध्ये, डॉ. शुभांगी दातार, वैदेही भिडे, अनिता पाटील, अंजली शेवडे, स्मिता शेंडे, आकांक्षा सावंत, अर्चना नाईक, क्रांती गोडबोले-पाटील आणि मृण्मयी ओक ह्यांनी. ह्या 500 मुलांच्या उत्तरपत्रिकांमधून ६५ मुलांची निवड करण्यात आली. यांनतर रंगली गटचर्चा. शनिवारी, दोन नोव्हेंबरला ‘वयम्’च्या कॉन्फरन्स रूममध्ये गटचर्चा पार पडली. मुलांनी आपले विचार बेधडकपणे मांडले. मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, नांदेड, सातारा अशा महाराष्ट्राच्या जवळजवळ सगळ्या भागातील निवडक ६५ मुलं दोन नोव्हेंबरला ठाण्याला आली. ६५ मुलं ६ गटांत विभागली होती. गटचर्चेच्या आधी मुलांना उत्स्फूर्त लेखन आणि चित्रवर्णन करायला दिले होते. त्यानंतर प्रत्येक गटाला विषय दिले. एका विषयाला २० मिनिटे आणि असे दोन विषय. विषयदेखील फार वेगळे होते. ‘मान-अपमान’, ‘प्रवास’, ‘विद्यार्थ्यांच्या आत्महत्या’, ‘स्वीडनमधील एक मुलगी आणि जग’, ‘१५० वर्षांचे गांधीजी’ अशा काही विषयांवर मुलांनी चर्च ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .