भेद सारे मावळू द्या...

वयम्    शुभदा चौकर    2020-03-01 10:00:52   

आपण नक्की मुले-मुली यांच्यात समभाव मानणाऱ्या गटात आहोत ना, हे स्वत: कायम तपासत राहिले पाहिजे. शाळेत एखादा कार्यक्रम साजरा करण्याआधी आयोजनाची आखणी करतो तेव्हा स्वागत करायला मुलींची आणि बाकडी रचायला, जाजम अंथरायला मुलग्यांची ड्युटी लावतो. अशा गल्लती आपण करतो काही वेळा!

वयम् दोस्तांनो, एखाद्या महिलेला जाळण्याचा प्रयत्न करणे, ही झाली विकृती. मुली-महिलांचा अपमान होईल असे बोलणे, ही झाली हीन-वृत्ती आणि महिलांना लष्करातही न डावलता, सुसंधी देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ही संस्कृती! या तिन्ही प्रकारांतील बातम्या आपल्याला वाचायला मिळतात. महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या वाचून आपण अस्वस्थ होतो. महिलांना कमी लेखणारी कृती बघून आपण खजील होतो; आणि मुलींच्या, महिलांच्या क्षमतेवर विश्वास ठेवणाऱ्या सकारात्मक बातम्या वाचून मनाला आनंद होतो. (लष्करात महिलांना कायम पदे देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जे युक्तिवाद झाले, त्या बातम्या वाचून समजून घ्या.) मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव न करणाऱ्या गटातील माणसे जसजशी वाढत जातील, तसतसे मुली व महिलांवरील अन्याय, अत्याचार कमी होत जातील. आपण नक्की मुले-मुली यांच्यात समभाव मानणाऱ्या गटात आहोत ना, हे स्वत: कायम तपासत राहिले पाहिजे हं! कारण असे आहे ना की, मुले-मुली हा भेदभाव समाजातील अनेकांच्या मनात घट्ट रुजलेला असतो. त्यांचे बघून आपणही काही वेळा चुकून तेच अनुसरतो. त्यांचा राग करण्यात अर्थ नाही, कारण ते तसेच बघत, ऐकत मोठे झालेले असतात ना! आपण आधुनिक काळात वाढतोय. मुलगा आणि मुलगी वेगवेगळे असले तरी त्यांच्यातील कोणीच कमी-जास्त क्षमतेचे नाही, हे माहिती आहे आपल ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


वयम् - संपादकीय

प्रतिक्रिया

  1. asmitaphadke

      5 वर्षांपूर्वी

    Nice article ! We really need this change of attitude.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen