२८ तारखेला 'राष्ट्रीय विज्ञान दिन' देशभर साजरा करण्यात येतो. त्यानिमित 'वयम्'च्या फेब्रुवारी २०१८ च्या अंकातील हा लेख खास विज्ञानदिना निमित्त- मित्रांनो, आपल्या सार्या भारतीयांसाठी फेब्रुवारी महिना हा महत्त्वाचा आहे. याचं कारण याच महिन्याच्या २८ तारखेला 'राष्ट्रीय विज्ञान दिन' देशभर साजरा करण्यात येतो. दरवर्षी त्या दिवशीचं म्हणून एक घोषवाक्य जाहीर केलं जातं आणि त्या दिवशी देशभर होणारे कार्यक्रम त्या घोषवाक्याच्या अनुषंगानं केले जातात. या कार्यक्रमांमध्ये शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं, विविध संशोधन संस्था यांच्यातील विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, शास्त्रज्ञ, संशोधक भाग घेतात. हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली, ती १९८६ सालापासून. भारताचे नोबेल पारितोषिक मिळवणारे थोर शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी दि. २८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी कलकत्ता येथील 'इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स' या संस्थेत आपल्या संशोधनाची घोषणा केली. हे संशोधन 'रामन परिणाम' म्हणून ओळखलं जातं. याच संशोधनाबद्दल रामन यांना १९३० साली नोबेल पारितोषिक मिळालं. रामन यांच्या या संशोधनकार्याचं स्मरण कायम राहावं, त्यांच्या ध्येयनिष्ठ आणि विज्ञानालाच वाहून घेतलेल्या जीवनापासून नवीन पिढीला स्फूर्ती मिळावी, यासाठीच दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, अशी सूचना ‘नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन' (एनसीएसटीसी) या संस्थेनं भारत सरकारला केली आणि भारत सरकारनं ती मान्य केली. तेव्हापासून दरवर्षी २८ फेब्रुवारी हा ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून देशभर साजरा करण्यात येतो. रामन यांच्या कार्याप ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .