अपने रास्ते, आस्ते आस्ते !


‘आपला रस्ता’ निवडून, न मळलेल्या वाटेवर जाणारे काही अवलिया नाशिकच्या ‘वेध’मध्ये भेटले. त्यांच्या मुलाखती ऐकून त्याबद्दल लिहितोय IPH व ‘वयम्’च्या ‘बहुरंगी बहर’ या प्रकल्पातील उभरता लेखक-

नाशिक ‘वेध’चे हे नववे वर्ष! दिवसभरात अनेक मान्यवरांच्या मुलाखती डॉ. आंनद नाडकर्णी यांनी घेतल्या. या वर्षीची थीम होती- ‘अपने रास्ते, आस्ते आस्ते’. जीवनाच्या प्रवासाला निघाल्यावर समोर अनेक रस्ते दिसत असतात, त्यांपैकी ‘आपला रस्ता’ निवडून, न मळलेल्या वाटेवर जाणारे हे अवलिया आमच्यासमोर आले. ‘आस्ते आस्ते’चा अर्थ हळूहळू चालणारे असा नसून, ‘आपल्या रस्त्यावर चालताना काळजीपूर्वक जपून चालणे’ असा होता. पहिल्या सत्रात होते अजित जोशी- IAS. ते थेट चंदिगडहून आले होते. त्यांच्यावरील चित्रफितीतून त्यांच्या कामाविषयी अंदाज आला, परंतु त्यांना खुलवण्याचं काम केलं डॉक्टरकाकांनी! अजित जोशी मूळचे सोलापूरचे. दहावीपर्यंतचं शिक्षण सोलापूरमध्ये झाल्यावर त्यांनी अकरावी- बारावीचं  शिक्षण पुण्यात, आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण मुंबईत घेतलं. त्यांच्या आजोळच्या घराशेजारी कलेक्टर राहत. अजित जोशी यांची आई त्यांना “कलेक्टर हो” असे सांगायची. त्यांनी दहावीत असताना ठरवलं की, आपण कलेक्टर व्हायचं. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतानाच त्यांनी IASचा अभ्यासही सुरू केला. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर ‘इन्फोसिस’ कंपनीत लागलेली नोकरी त्यांनी नाकारली आणि स्पर्धापरीक्षांवर लक्ष एकाग्र केलं.  त्याचं फळ म्हणजे अजित महाराष्ट्रातून पहिले आले. त्यांचं पहिलं पोस्टिंग हरियाणात झालं. हरियाणातील पानिपत इथे ते रुजू झाले. ‘पानिपत’ हा आपल्यासाठी जिव्हाळ्याचा विषय; परंतु तेथील लोकांना पानिपतच्या ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


व्यक्तिमत्व विकास

प्रतिक्रिया

  1. ajitbmunj

      2 वर्षांपूर्वी

    प्रेरणादायीवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen