सृष्टीचे कठोर नियम


अंटार्क्टिकातील ‘मैत्री’ संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांना थंडी-वाऱ्यात काम करावे लागते. शास्त्रज्ञ, आणि त्यांना मदत करणारे लॉजिस्टिक सदस्य खूपच खडतर स्थितीत सातत्याने काम करत असतात; सृष्टीचे नियम पाळूनच त्यांना तिथे काम करावे लागते. मात्र, तेथील स्वर्गीय सौंदर्य अनुभवले की, हा कामाचा शीण बराचसा दूर होतो.

अंटार्क्टिकातील ‘मैत्री’ संशोधन केंद्रात मी लवकरच रुळले. सुमारे वर्षभरासाठी पृथ्वीच्या तळाशी असलेल्या ह्या खंडावर माझं एक अनोखं आयुष्य सुरू झालं. उन्हाळ्याचे दिवस असल्याने, मध्यरात्रीदेखील सूर्य आकाशात तळपत होता. उजेडाचा पुरेपूर उपयोग करून कामांचा सपाटा सुरू होता. सारे सदस्य आपापल्या कामात व्यग्र होते. दर पंधरवड्यातून एकदा सर्व सदस्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते आणि तब्येतीच्या काही तक्रारी असतील तर त्याचे निवारण केले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत फिल्डवर्क खूप असल्याने कुणाला मुका मार लागणे, बर्फावर चालताना पाय घसरून पडणे-झडणे यासाठी उपाययोजना करणे या माझ्या डॉक्टरी कामांमध्ये मीही व्यग्र होते. रोज सकाळी ६.३०ला योगासन वर्ग होत असे. ७.३० वाजता नाश्ता.  उन्हाळ्यात विमाने व जहाजं ये-जा करत असल्याने भाज्या व फळांचा पुरवठा केला जातो; परंतु हिवाळ्यात हे शक्य होत नाही. अन्नधान्य, किराणा सामान, लोणचे, मसाला, पापड ह्यांचा मुबलक साठा संशोधन केंद्रात उपलब्ध असतो. गोठलेल्या मांसाहारी पदार्थांचा साठा वर्षभरासाठी केलेला असतो, परंतु शाकाहारी सदस्यांसाठी भाज्या-फळं कायम मिळणे अशक्य होते! हिवाळ्यातील कमी तापमानात कडधान्यांना मोड येणेही कठीण असते. सकाळी नऊ वाजल्यापासून विविध कामांसाठी लॉजिस्टिक व सायंटिस्ट मंडळी क ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘वयम्’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


अनुभव कथन , बालसाहित्य , पर्यावरण , विज्ञान- तंत्रज्ञान

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.