डॉ. बाळ फोंडके यांनी एप्रिलच्या अंकात लिहिलेलं करोना व्हायरसचं माहितीपर आत्मवृत्त-
ओsह हाय! मी--. पण मी कोण ते कळेलच तुम्हांला हळूहळू. सध्या मात्र मी खूप खुषीत आहे. अगदी फूल टू धमाल! खरं तर मी तुमच्याशी अशा सलगीनं बोलावं की काय याची मला शंकाच आहे. तुमची बरोबरी मी कशी करणार? कारण मला तुमच्यासारखा मेंदू नाही. मेंदू नाही म्हणजे बुद्धिमत्ताही नाही; मज्जासंस्थाही नाही कोणत्याही संवेदनांना दाद द्यायला. मी सजीव की निर्जीव हेही सांगता येणार नाही. सजीव सगळे पेशींचे बनलेले असतात. माझ्या अंगी एकही पेशी नाही. मी स्वतःच्या बळावर माझी वाढही करू शकत नाही की, माझ्या पुढच्या पिढीला जन्माला घालू शकत नाही. माझ्या आयुष्याची इतिकर्तव्यता, हे तुमच्यासारखं भारीभरकम बोलता यावं म्हणून हं. नाहीतर माझं आयुष्य म्हणायलाही काही अर्थ नाही. तर ते असो. माझं एकमेव काम काय, तर ज्याच्या अंगावर चिकटून बसता येईल अशा कोणातरीचा शोध घेणं. आणि तो सापडला की, मी त्याला अशी गळामिठी मारतो की सुटकाच नाही. माझीही नाही आणि त्याचीही नाही. ते झालं की, मी मग मोकाट सुटतो. सार्याह जगाला हादरवून टाकू शकतो. तुमचा तो दहशतवादी माझ्यापुढं किस झाडकी पत्ती! मी सजीवही नाही तर मग मी ही करामत कशी करू शकतो? म्हटलं तर ते सोपं आहे आणि तसंच म्हटलं तर गुंतागुंतीचंही आहे. तर आधी सोप्पं. एकदा का एक सजीव पेशी मला सापडली की, मग तिचा वापर करून मी माझ्याच कॉपीज बनवतो. माझी मुलंच म्हणाना. आणि ती मुलंही मग तेच करतात. आणि आमची संख्या पुरेशी वाढली की, मग त्या पेशीचा काही उपयोग राहत नाही. मग तिचं पोट फोडून आम्ही बाहेर पडतो. प्रत्येक जण एकेका नव्या पेशीच्या शोधात. त्या सा ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
dvlele
5 वर्षांपूर्वीमस्त सत्य गंमतीदार प्रास्तूत्य.