बहुरूपी फ्लूचे दशावतार


'करोना व्हायरसची महाभयंकर साथ जगात फैलावते आहे. लसूण खा! व्हिटॅमिन सी घ्या! मास्क लावा!' अधिकारवाणीने अनेक लोक बरंच काही सांगतात, लिहितात.  खरं काय आहे?

सगळे विषाणू (व्हायरस) भणंगभटके, ऐतखाऊ असतात. आपले प्रथिनांचे (प्रोटीन्स) कपडे काढून टाकून त्यांचे उघडेबोडके जनुक (जीन्स) माणसांच्या, प्राण्यापक्ष्यांच्या पेशींमध्ये घुसतात आणि त्या पेशींकडून मरेमरेतो काम करवून आपल्यासारखे नवे जनुक आणि त्यांच्यासाठी प्रथिनांचे (प्रोटीन्स) कपडे बनवून घेतात. पेशी मरायला टेकल्या की, तो कपडे ल्यालेल्या नव्या विषाणूंचा घोळका त्या पेशींना फोडून त्यांच्यातून बाहेर पडतो. पुन्हा नव्या पेशींकडे जाऊन, कपडे फेकून नव्याने घुसखोरी सुरू करतो. ज्या शरीरात ती घुसखोरी चालते, त्या शरीरातल्या पेशींना स्वतःची कामं करताच येत नाहीत. म्हणून आजार होतो. गोवर-गालगुंडांसारखे आजार एकदा झाले की, त्यांच्या विषाणूंचा पेहराव आपल्या लढाऊ पेशींच्या जन्मभर लक्षात राहतो. म्हणून ते आजार सहसा पुन्हा होत नाहीत. शिवाय त्या ठरावीक पोशाखाच्या शेंड्याशेपट्यांच्या प्रती काढून त्या विषाणूंसाठी प्रतिबंधक लसही बनवता येते. फ्लू घराण्याची रीतच वेगळी. आपलेच नवे जनुक बनवून घेताना ते इतक्या चुका करतात की, बनणारे नवे जनुक फारच वेगळे असतात आणि त्यांच्यावरून बेतलेले प्रथिन कपडे नव्याच मापाचे, फॅशनचे असतात. त्यांना पोशाखावरून ओळखणार्‍या लढाऊ पेशींची फसगत होते. शिवाय एकाच पेशीत जर दोन प्रकारचे फ्लू-विषाणू एकत्र आले तर ते प्रेमाने आपल्या जनुकांच्या तुकड्यांची देवाणघेवाण करतात. दोघांच्याही पेहरावाची फॅशन बदलते. त्या बहुरूपी विषाणूंशी लढणं पेशींना जमत नाही. त्यांच्यासाठी लस बनवण ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रिया

  1. avthite

      2 वर्षांपूर्वी

    इतकी अवघड माहिती इतक्या सहज समजेल अशा भाषेत डॉक्टरांनी सांगितली त्याबद्दल त्यांचे शतशः आभार.. करोना चा युरेकाच करून टाकला डॉ. दळवी सरांनी???वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen