I care for you!

वयम्    शुभदा चौकर    2020-04-08 11:47:26   

करोना काळात आपण काय करावं याविषयी बरेच लेख, मेसेज वाचले असतील. परंतु स्वतः बरोबर आपण दुसऱ्याचीही काळजी कशी घेतली पाहिजे हे सांगणारं 'I care for you' हे शुभदा चौकर यांनी लिहिलेलं संपादकीय-

‘वयम्’ दोस्तांनो, आज वृत्तपत्रातल्या एका फोटोने दिवसभर मनात घर केलं. रेल्वेने प्रवास करताना डब्यातील खांब आणि कड्यांना कित्ती जणांचे हात लागले असतील, त्यातून करोना व्हायरसची लागण लागेल म्हणून रात्री काही रेल्वे कर्मचारी ते खांब व कड्या स्वच्छ पुसून काढत होते. रेल्वे ट्रेनच्या विश्रांतीच्या वेळात हे काही जण अविश्रांत झटत होते. ट्रेनमधून उतरून रिक्शा स्टँडवर गेले, तर एक सर्वसामान्य बाई रिक्षावाल्यांना घरगुती शिवलेले कापडी मास्क वाटत होती. पुण्यात हॉटेल बंद झाल्यावर तिथे एकेकट्या राहणार्याॉ विद्यार्थ्यांना, तरुणांना घरचे जेवण खाऊ घालण्याची व्यवस्था करण्यासाठी अनेक जण तातडीने पुढे सरसावले. देशभरातील हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि त्यांचे सहकारी तर सतत ड्युटीवर आहेत. विमानतळावरील कर्मचारी अफाट मेहनत करत आहेत. आपल्याला दूध, पाणी, वीज, धान्य, भाज्या अशा सर्व अत्यावश्यक गोष्टी मिळाव्या, यासाठी कितीतरी जण झटत आहेत. कठीण प्रसंगात माणसांचे खरे रंग कळतात, असे म्हणतात. एकीकडे सर्वत्र भीतीचे वातावरण असताना माणुसकीचे रंगीबेरंगी दर्शनही घडते आहे. ही माणसे शांतपणे काम करत आहेत, कारण त्यांना आपली काळजी आहे. जणू ते त्यांच्या कामातून सांगताहेत –I care for you! करोना व्हायरसच्या थैमानाने आपल्या समाजाला अनेक धडे दिले, त्यांतील हा एक महत्त्वाचा धडा! स्वतःची काळजी घेत असताना इतरांचीही काळजी घेणे!! करोना व्हायरसच्या भीतीचे सावट सर्वत्र पसरलेल ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘वयम्’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.