बँक ऑफ आयडीया !

वयम्    प्राची पाठक    2020-04-10 10:00:00   

एप्रिल महिना हा सुट्टीचा असल्याने सुट्टीत काय करावं याच्या आयडियाज प्राची पाठक यांनी दिल्या आहेत. सद्य परिस्थितीचा विचार करून या अचानक मिळालेल्या सुट्टीत त्या उपयोगी पडतील...

रोजच्या घाईगडबडीत आपण अनेक गोष्टी ‘वेळ मिळाल्यावर करेन’ या यादीत टाकून ठेवलेल्या असतात… जणू मनामध्ये ‘पार्क’ करून ठेवतो. त्यांना पार्किंग लॉटमधून काढणार कधी?  मोकळा वेळ मिळताच स्क्रीनमध्ये डोकं घालावंसं वाटतं आणि मग मोठ्या माणसांचा ओरडा खावा लागतो. हो ना? अशावेळी काय करायचं? • आपली "वेळ मिळाल्यावर करू" ही यादी एकदा नीट लिहून काढायची. आपली आपण ‘Bank of Ideas’ तयार करायची. • त्यातील अनेक गोष्टी आणखीन चांगल्याप्रकारे करण्यासाठी आपल्याला या स्क्रीनचा, इंटरनेटचा झाला तर उपयोग होऊ शकतो. म्हणजे असं बघा, आपल्याला एखादी शॉर्ट फिल्म बनवून बघायची असते. तिचे सेटिंग्ज शिकण्यासाठी, कॅमेऱ्याच्या वेगवेगळ्या टिप्स मिळवण्यासाठी, आपल्यासारखं आणखीन कोणी नुकतीच अशी सुरुवात केलीये, हे समजून घेण्यासाठी स्क्रीन टाईम वापरायचा. • आपल्या जवळपास एखादे ऐतिहासिक ठिकाण असते. ते ठिकाण पाहायला जाण्यापूर्वी त्याची आणखीन माहिती घेण्यासाठी, रूट ठरवण्यासाठी आपण स्क्रीन टाईम वापरू शकतो. बरेच जण आधी ह्या स्पॉटवर गेलेले असू शकतात. त्यांनी त्या जागेचे काही व्हिडीओज देखील यू ट्यूबवर टाकलेले असू शकतात. • शाळेच्या पुस्तकातल्या जवळपास प्रत्येक धड्यात किंवा धड्याखाली "करून पाहा" अशी एक सूचना असते. परीक्षेसाठी धडा वाचता वाचता हे प्रश्न ऑप्शनला टाकलेले असतात. सुट्टीत गेल्या वर्षीच्या आवडत्या विषयाच्या तरी अशा "आऊट ऑफ सिलॅबस" म्हणून बाजूला टाकलेल्या गोष्टी करून बघता येतील. उदाहरणार्थ, काच ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen