‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 1

वयम्    शुभदा चौकर    2020-04-13 12:40:31   

घरोघरीची मुले सध्या घरी आहेत. यंदा करोना विषाणूमुळे अचानक मिळालेली सुट्टी शिवाय सर्व कुटुंबीयही घरी, अशा या काळात मुलांनी काय नवे अनुभव घेतले, त्यांना कोणत्या नव्या जाणिवा झाल्या, हे जाणून घेण्यासाठी ‘वयम्’ मासिकातर्फे करण्यात आलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रोजच्या रोज ‘वयम्’ वाचक-मुलांचे अनुभव-लेख वाचायला मिळत आहे. त्यात संभ्रम-काळाबद्दल मुलांच्या मनात निर्माण झालेल्या विविध भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यात हुरहूर, काळजी, चिंता अशा भावना स्वाभाविकपणे प्रकट झाल्या असल्या तरी बहुतांश मुलांनी ही परिस्थिती फार समजूतदारपणे स्वीकारली आहे. सुट्टी असूनही घराच्या बाहेर पडता येणार नाही, मित्रांबरोबरही खेळता येणार नाही- अशा नियमांचे पालन करण्याचा शहाणपणाही मुलांनी दाखवला आहे. या मुलांनी वेगवेगळे अनुभव घेण्याची संधी म्हणून या काळाचा वापर केला आहे. त्यांनी काय काय केले हे त्यांच्याच शब्दांत पण थोडक्यात समोर ठेवणारी ही अनुभव-मालिका वाचा-   

अनुभव-मालिका- 

  1. नर्स आईला प्रेमळ चिठ्ठी!
साईराज सावंत, हा इयत्ता दुसरीत, गोरेगावच्या डोसीबाई जीजीभाय या मराठी शाळेत शिकणारा मुलगा. योग्य वेळी आवश्यक तेवढेच बोलणारा, कोणाच्या अध्यात मध्यात नसणारा. आपल्या छोट्या भावाबद्दल भरभरून बोलणारा आणि वर्गात सर्वांचा लाडका. त्याची आई बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात नर्सचे काम करते. बाबा छोटासा व्यवसाय करता करता छोट्या बाळाला आणि साईराजला सांभाळत आहेत. सध्या साईराज व त्याचा ९ महिन्यांचा भाऊ बाबासोबत गावी आहे आणि आई इथे मुंबईत ति ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1.   5 वर्षांपूर्वी

    अनुभव लेख खूप आनंद देतात. पुन्हा लहान होऊन मुलांबरोबर घडतो. सर्वगुणसंपन्नतेचा व छंदाचा अनुभव मस्त



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen