मशरूम साम्राज्य!

वयम्    मकरंद जोशी    2020-08-17 10:00:37   

गरमागरम मशरूम सूपचे घुटके घेताना किंवा मशरूमचे चटपटीत पदार्थ खाताना तुम्ही निसर्गातील एका मोठ्या ‘फंगी किंगडम’चा हिस्सा असलेल्या अनोख्या गोष्टीचा आनंद घेताय हे समजून घ्या-

असं समजा की तुम्ही ‘कौन बनेगा करोडपती?’च्या हॉटसीटवर बसला आहात आणि दहा लाखांसाठी प्रश्न विचारण्यात आलाय की, ‘असं काय आहे जे वनस्पती नाही, पण शाकाहारी आहारात समाविष्ट केलं जातं?’ जरा गुगली प्रश्न आहे ना? या प्रश्नाचं उत्तर आहे- अळंबी म्हणजे मशरूम्स. पावसाळ्यामध्ये अचानक एखाद्या लाकडाच्या ओंडक्यावर किंवा रस्त्याच्या कडेला जमिनीतून वर आलेल्या पाहायला मिळतात. जगभरात युरोपपासून ते जपानपर्यंत वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीत स्वतःची जागा निर्माण करणाऱ्या मशरूम्स जर वनस्पती नाहीत तर मग काय आहेत? फक्त पावसाळ्यातच दिसतात का? त्यांचेही प्रकार असतात का? ...अळंब्यांच्या अद्भूत विश्वात जरा डोकावूया. अळंबी/ मशरूम्स या वनस्पतींच्या गटात, वर्गात बसत नाहीत. वनस्पतींमध्ये क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य असते, ज्याच्यामुळे त्या सूर्यकिरणांच्या मदतीने स्वतःचे अन्न तयार करून, वाढू शकतात. अळंब्यांमध्ये हे हरितद्रव्य नसते. कारण अळंबी काही वनस्पतींसारखी स्वतंत्र जिवंत गोष्ट नाही. प्राणी आणि वनस्पतींपेक्षा वेगळी रचना, वैशिष्ट्ये असल्याने बुरशीचा जीवसृष्टीत स्वतंत्र विभाग ‘फंगी किंगडम’ मानला जातो. फंगीदेखील प्राण्यांप्रमाणेच स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही. तसेच त्या वनस्पतींप्रमाणे प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत. अन्न मिळवण्यासाठी फंगी भोवतालच्या वातावरणात काही पाचक द्रव्ये सोडतात आणि त्याद्वारे आवश्यक ती पोषक द्रव्ये विरघळून मिळवतात. निसर्गाने विघटन करण्याची जबाबदारी फंगींJjवर सोपवलेली आहे. फंगींचे ढोबळपणे तीन प्र ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘वयम्’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.